TRENDING:

पूजासोबत फिरला अन् बायकोच्या फोनमुळे जीव दिला, डान्सरबाईच्या नादापायी आणखी एक 'गोविंद बर्गे' प्रकरण

Last Updated:
काही दिवसांपूर्वी पूजा गायकवाड या नर्तिकेच्या नादापायी गोविंद बर्गे नावाच्या तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा धाराशिवमध्ये एका कला केंद्रात डान्स करणारा महिलेमुळे एक तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे
advertisement
1/6
पूजासोबत फिरला अन् बायकोच्या फोनमुळे जीव दिला,बाईच्या नादापायी आणखी एक 'गोविंद'
काही दिवसांपूर्वी पूजा गायकवाड या नर्तिकेच्या नादापायी गोविंद बर्गे नावाच्या तरुणाने गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा धाराशिवमध्ये एका कला केंद्रात डान्स करणारा महिलेमुळे एक तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी कला केंद्र हेच त्याचं मुळ असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
2/6
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव मधील साई कला केंद्रामध्ये नृत्य काम करणाऱ्या महिला आणि प्रियकरात वाद झाला होता. या वादातून प्रियकराने आत्महत्या केली. अश्रुबा अंकुश कांबळे (वय वर्ष 39) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
advertisement
3/6
मंगळवारी अश्रुबा आणि महिला पूजा वाघमारे हे दोघे शिखर शिंगणापूर इथं देवदर्शनासाठी गेले होते. धक्कादायक म्हणजे, अश्रुबा कांबळे हा विवाहित होता. तर पूजा वाघमारे सुद्धा विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/6
देवदर्शनावरून परतत असताना तरुणाच्या पत्नीचा फोन आला. या फोनवरुन दोघांमध्ये भांडण झालं. संतापाच्या भरात आश्रुबाने "आत्महत्या करतो" अशी धमकी दिली.
advertisement
5/6
मात्र, पूजाने त्याकडे लक्ष दिलं नाही. पूजासोबत भांडण झाल्यानंतर आश्रुबा थेट चोराखळी परिसरात आला आणि झाडाला गळफास लावून जीवन यात्रा संपवली. अश्रुबाने आत्महत्या केल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.
advertisement
6/6
स्थानिकांनी याची माहिती तात्काळ येरमाळा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, या प्रकरणी पूजा वाघमारेवर गुन्हा दाखल केला आहे. पूजा वाघमारेलाा पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. येरमाळा पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे या नर्तिका महिलेवर कलम 108 बी एम एस नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
पूजासोबत फिरला अन् बायकोच्या फोनमुळे जीव दिला, डान्सरबाईच्या नादापायी आणखी एक 'गोविंद बर्गे' प्रकरण
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल