TRENDING:

महाराष्ट्रात हवामानाचा यू-टर्न! दिवसा दमट उकाडा, रात्री गारवा; पुढच्या आठवड्यात कसं राहणार हवामान?

Last Updated:
पश्चिम बंगाल, अरबी समुद्रात वारे, केरळ तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात तापमानात घट, मुंबईत गारवा, विदर्भ मराठवाड्यात कोरडे वातावरण, छत्रपती संभाजीनगरात थंडी.
advertisement
1/7
हवामानाचा यू-टर्न! दिवसा दमट, रात्री गारवा; पुढच्या आठवड्यात कसं राहणार हवामान
पश्चिम बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात दोन्हीकडे सध्या वारे फिरले आहेत. समुद्र खवळला आहे त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळ आणि तमिळनाडूमध्ये 10 नोव्हेंबरपर्यंत अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
2/7
उत्तरेकडे ५ डिग्रीपर्यंत तापमानात घट झाली आहे. उत्तरेकडून थंड वारे पुढे सरकत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात काही ठिकाणी दिवसा पाऊस, दमट हवामान, ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी थंडी असं विचित्र वातावरण तयार झालं आहे. पुढचे 6 दिवस 2 ते 5 डिग्री तापमान कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राशेजारील राज्य केरळमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. उत्तरेकडे देखील एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. मैदानी भागात 2-5 डिग्री तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वातावरणात कोणतेही बदल होणार नाहीत.
advertisement
4/7
मुंबईसाठी पुढचे 24 तास कमाल आणि किमान तापमान 32 अंश सेल्सियस आणि 23 अंश सेल्सियस राहाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात गारवा राहणार आहे. रात्रीच्या वेळी तापमान 20 अंशांपर्यंत खाली येणार आहे. महाराष्ट्रात येत्या २ आठवड्यात ७-२० नोव्हेंबर दरम्यान किमान आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
मध्य महाराष्ट्रात तापमान 20 ते 16 अंशांपर्यंत आलं आहे. तर कमाल तापमान हे 30-32 डिग्री सेल्सियसपर्यंत राहाणार आहे. कोकणात ढगाळ वातावरणामुळे उष्ण आणि रात्रीच्या वेळी थंडी असं वातावरण आहे. विदर्भ मराठवाड्यातही तापमानाचा पार घसरायला सुरुवात झाली आहे.
advertisement
6/7
[caption id="attachment_1524429" align="alignnone" width="750"] मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांतही कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
7/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची शक्यता नाही. सर्वत्र कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. नागपूरमधील कमाल तापमान 30 अंशांच्या आसपास तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात हवामानाचा यू-टर्न! दिवसा दमट उकाडा, रात्री गारवा; पुढच्या आठवड्यात कसं राहणार हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल