‘रामायण’ मधील शूर्पणखा आता कशी दिसते? 38 वर्षांनंतर ओळखणंही झालंय कठीण, PHOTO पाहताच व्हाल शॉक
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Ramayan Shurpanakha : रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये राम-सीता यांच्याशिवाय रावणाची बहीण शूर्पणखेच्या भूमिकेनेही प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. 38 वर्षांनंतर शूर्पणखेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेनू धारीवाल यांचा लुक पूर्णपणे बदलून गेला आहे.
advertisement
1/7

भारतातील सर्वात लोकप्रिय पौराणिक टीव्ही शो अर्थात ‘रामायण’ची सुरुवात 1987 साली झाली होती. रामानंद सागर यांच्या या मालिकेची कथा आणि त्यातील कलाकार आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहेत. भगवान राम आणि सीतेच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित ‘रामायण’मध्ये अरुण गोविल (राम) आणि दीपिका चिखलिया (सीता) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. हे दोन्ही कलाकार अनेक वर्षांपासून राम-सीता म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
advertisement
2/7
'रामायण'मधील असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या भूमिकेच्या नावाने प्रसिद्ध झाले आणि प्रेक्षक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे, तर मालिकेतील पात्राच्या नावानेच ओळखतात. मग ते लक्ष्मणाची भूमिका असो किंवा रावणाची बहीण शूर्पणखा साकारणारी अभिनेत्री रेनू धारीवाल असो.
advertisement
3/7
‘रामायण’मधील शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या रेनू धारीवाल यांचे हास्य आणि भयावह रूप आजही सर्वांच्या लक्षात आहे.
advertisement
4/7
पण गेल्या 38 वर्षांत रेनू धारीवाल यांचा लुक पूर्णपणे बदलला आहे. रेनू धारीवाल यांनी फक्त 22 व्या वर्षी शूर्पणखेची भूमिका साकारली होती. आज त्या 61 वर्षांच्या झाल्या आहेत आणि त्यांचा बदल पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. ‘रामायण’मध्ये शूर्पणखा ला कुरूप, असभ्य आणि भयंकर राक्षसी म्हणून दाखवले गेले होते, पण खऱ्या आयुष्यात त्या अगदी वेगळ्या दिसतात.
advertisement
5/7
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ‘रामायण’मधील शूर्पणखा म्हणजेच रेनू धारीवाल यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचा 23 वर्षांचा मुलगाही आहे. रेनू धारीवाल यांनी सिनेसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाचा इंडस्ट्रीला राम-राम केला आणि राजकारणात पाऊल टाकलं.
advertisement
6/7
शाहरुख खानच्या ‘दिल आशना है’ या 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात रेनू धारीवालही दिसल्या होत्या. या चित्रपटात रेनू धारीवाल यांनी शाहरुख खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. रेनू धारीवाल या ‘मस्त कलंदर’ (1991), ‘खिलाफ’ (1991) आणि ‘भ्रष्टाचार’ (1989) या चित्रपटांत झळकल्या आहेत.
advertisement
7/7
‘रामायण’ ही एक अतिशय यशस्वी टीव्ही मालिका आहे. या मालिकेची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केले होते. 78 भागांच्या या मालिकेचं प्रसारण दूरदर्शनवर 25 जानेवारी 1987 ते 31 जुलै 1988 पर्यंत झालं होतं. कोरोना काळात 28 मार्च 2020 पासून या मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्यात आले. ही मालिका तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
‘रामायण’ मधील शूर्पणखा आता कशी दिसते? 38 वर्षांनंतर ओळखणंही झालंय कठीण, PHOTO पाहताच व्हाल शॉक