IPL 2026 : एकाची हकालपट्टी, दोघांना दुखापत, रहाणेकडे उरला नाही एकही 'इंटरनॅशनल' बॉलर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 चा मोसम 28 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणार आहे.
advertisement
1/7

आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात केकेआरची टीम मुंबई इंडियन्ससोबत भिडणार आहे. 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई-केकेआर यांच्यात लढत होईल. यंदाच्या मोसमात मुंबईची कॅप्टन्सी हार्दिक पांड्याकडे तर केकेआरची कॅप्टन्सी अजिंक्य रहाणेकडे आहे.
advertisement
2/7
आयपीएलच्या पहिल्याच मॅचआधी अजिंक्य रहाणेच्या केकेआरला धक्क्यावर धक्के बसत आहेत. केकेआरकडे सध्याच्या घडीला इंटरनॅशनल फास्ट बॉलरच नाहीये, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
advertisement
3/7
केकेआरचा फास्ट बॉलर हर्षित राणा हा दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण मोसमातून बाहेर झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या वॉर्मअप सामन्यात राणाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कपलाही मुकला होता. आता राणा आयपीएलमध्येही खेळू शकणार नाही.
advertisement
4/7
केकेआरने आयपीएल लिलावामध्ये श्रीलंकेचा फास्ट बॉलर मथीशा पथिराणाला 18 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं, पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये पथिराणाच्या डाव्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे तोदेखील वर्ल्ड कपमधून बाहेर झाला होता.
advertisement
5/7
पथिराणा याच्यावर सध्या श्रीलंकेमध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना पथिराणा मुकण्याची शक्यता आहे. रसेलच्या निवृत्तीनंतर केकेआरने पथिराणाला डेथ बॉलर म्हणून टीममध्ये आणलं, पण आता केकेआरला सुरूवातीच्या टप्प्यात नवा डेथ बॉलर शोधावा लागेल.
advertisement
6/7
आयपीएल 2026 च्या लिलावात केकेआरने बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमानला 9.20 कोटी रुपयांना विकत घेतलं. पण भारत-बांगलादेश यांच्यातले संबंध खराब झाल्यामुळे मुस्तफिजुरची आयपीएलमधून हकालपट्टी झाली.
advertisement
7/7
हर्षित राणा, पथिराणा आणि मुस्तफिजुर हे तिन्ही फास्ट बॉलर नसल्यामुळे केकेआरकडे आता आंतरराष्ट्रीय टी-20 दर्जाचा बॉलरच उरलेला नाही. पहिल्या सामन्यासाठी केकेआरकडे आता उमरान मलिक, वैभव अरोरा, आकाश दीप, कार्तिक त्यागी आणि प्रशांत सोळंकी हेच पर्याय आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : एकाची हकालपट्टी, दोघांना दुखापत, रहाणेकडे उरला नाही एकही 'इंटरनॅशनल' बॉलर!