Ajit Pawar Plane Crash : बारामतीत कुठे आहे ते ठिकाण? जिथं अजित पवारांचं विमान झालं क्रॅश
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार सभेसाठी बारामतीत जात असताना लँडिगवेळी गोजुबावी इथंच त्यांचं प्लेन क्रॅश झालं. बारामतीत हे ठिकाण नेमकं आहे कुठे?
advertisement
1/5

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. अजित पवार बारामती दौऱ्यावर होते, तेव्हा लँडिंगदरम्यान त्यांचं विमान कोसळलं.
advertisement
2/5
बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी अजित पवार गेले होते. गोजुबावी येथे विमान उतरत असताना हा अपघात झाला.
advertisement
3/5
गोजुबावी हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. पुण्यापासून जवळपास 100 किमी दूर आणि बारामतीपासून 10 किमी अंतरावर आहे.
advertisement
4/5
गोजुबावी हे गाव पुण्यातील प्रमुख कृषी आणि व्यावसायिक क्षेत्रात येतं. एक कृषी क्षेत्र म्हणून प्रामुख्याने ओळखलं जातं.
advertisement
5/5
गोजुबावी हे गाव याआधीही विमान अपघातामुळे चर्चेत आलं होतं. ऑक्टोबर 2023 मध्ये गोजुबावी गावाजवळ एक ट्रेनिंग एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash : बारामतीत कुठे आहे ते ठिकाण? जिथं अजित पवारांचं विमान झालं क्रॅश