TRENDING:

लग्नात गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फक्त 30 रुपयांपासून वस्तू, अमरावतीत 'इथं' करा खरेदी

Last Updated:
एखाद्याच्या लग्नात हटके गिफ्ट देण्याचा विचार अनेकजण करत असतात. अशांसाठी अमरावतीत तांबे आणि पितळेत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
advertisement
1/7
लग्नात गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, 30 रुपयांपासून वस्तू, 'इथं' करा खरेदी
लग्नसराईचा सिझण सुरू असून नव दाम्पत्याला गिफ्ट काय द्यायचं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. फोटो फ्रेम आणि इतर नवनवीन वस्तू सध्या गिफ्ट म्हणून दिल्या जात आहे. प्रत्येकाने त्याच वस्तू देण्याऐवजी तुमच्यासाठी एक खास ऑप्शन म्हणून तांबे पितळेची भांडी, मूर्ती किंवा इतर नवनवीन वस्तू देखील उत्तम पर्याय ठरू शकतात.
advertisement
2/7
गजलक्ष्मी, सिंहासन, गाय वासरू, अन्नपूर्णा, दरवाज्यावर लावण्यासाठी नवनवीन पद्धतीचे दिवे, या सर्व वस्तू तुम्हाला लग्नात नवरीला गिफ्ट म्हणून देता येतात. अमरावतीत या वस्तू अगदी होलसेल दरात मिळतात.
advertisement
3/7
अमरावतीतील अंबादेवी परिसरात अशोक स्टोअर्स हे दुकान आहे. याठिकाणी तांब्या-पितळेच्या अनेक आकर्षक वस्तू मिळतात. आमच्याकडे तांबे पितळीच्या सर्व वस्तू उपलब्ध आहेत. अगदी 30 रुपयांपासून ते 25 ते 30 हजार रुपये किमतीच्या सर्व वस्तू तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळतील. आता लग्नसराईचा सिजन आहे. तेव्हा गिफ्ट म्हणून काही वस्तू तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर सप्तपदी, कन्यादान करताना सुद्धा अनेक भांडे, मूर्ती लागतात ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, असं सुनंदा गुडघे सांगतात.
advertisement
4/7
देव्हाऱ्यात लागणारी घंटी आमच्याकडे उपलब्ध आहेत. अगदी 30 रुपयांपासून ते 7 हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारच्या घंटी इथं मिळतील. त्यानंतर छोट्या छोट्या तांबे पितळीच्या प्लेटसुद्धा 35 रुपयांपासून उपलब्ध आहेत. त्यानंतर 100 रुपयांपासून कृष्ण, गणपती, स्वामी समर्थ आणि देवाच्या मूर्ती इथं उपलब्ध आहेत. या मूर्ती सुद्धा साईजनुसार किमतीमध्ये कमी जास्त तुम्हाला मिळतील.
advertisement
5/7
देवाच्या मूर्ती ठेवण्यासाठी लागणारे सिंहासन देखील उपलब्ध आहे. अगदी छोट्या साईज पासून ते मोठ्या साईजपर्यंत सिंहासन उपलब्ध आहे. ज्याची किंमत साईजनुसार ठरवली जाते. त्यानंतर गजलक्ष्मी सुद्धा उपलब्ध आहे. अगदी छोटी साईज पासून ते मोठ्यात मोठी साईज आहे.
advertisement
6/7
यात तुम्हाला किलोप्रमाणे आणि नगाप्रमाणे खरेदी करता येऊ शकते. शोपीस सुद्धा वेगवेगळे आहेत. जे तुम्हाला 300 रुपयांपासून मिळतील. ज्यात भिंतीवर ठेवता येथील असे दिवे, नवनवीन डिझाईनचे गणपती, स्वस्तिक आणि बरच काही होलसेल रेटमध्ये उपलब्ध असल्याचंही सुनंदा गुडघे सांगतात.
advertisement
7/7
दरम्यान, आता रामनवमीसाठी राम दरबार सुद्धा आलेले आहे. ते सुद्धा तुम्ही अगदी 250 रुपयांपासून खरेदी करू शकता. अशा सर्व वस्तू इथं उपलब्ध आहेत. आपणही खास गिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर अंबादेवी परिसरातील दुकान नंबर 8 इथं असणाऱ्या अशोक स्टोअरला भेट देऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अमरावती/
लग्नात गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फक्त 30 रुपयांपासून वस्तू, अमरावतीत 'इथं' करा खरेदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल