TRENDING:

Beed Flood: बीडमध्ये आर्मी... शेतीची वाताहात, उभं पीक आडवं; महापुराचं रौद्ररुप, मन सुन्न करणारे फोटो

Last Updated:
बीड तालुक्यातील हिंगणी हवेली,नांदूर हवेली, कुर्ला गाव परिसराती लोक अडकल्याने भारतीय सैन्य दलाचे तुकडी बचाव करण्यासाठी दाखल झाली आहे.
advertisement
1/8
बीडमध्ये आर्मी; महापुराचं रौद्ररुप, मन सुन्न करणारे फोटो
बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केल्यानंतर नदीकाठच्या तब्बल एक ते दीड किलोमीटर परिसरात पात्र विस्तारले यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. (सर्व फोटो सौजन्य - सुशांत काशीद)
advertisement
2/8
यातच बीडच्या हिंगणी हवेली आणि नांदूर हवेली परिसरात अनेक लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते त्यांच्या बचावाचे काम सुरू आहे.
advertisement
3/8
भयानकता ड्रोनच्या माध्यमातून स्पष्ट दिसत आहे. नदीपात्र रुंद झाल्याने अनेकांची पिकासह जमीन खरडून गेली असून, जनावरे वाहून गेले आहेत.
advertisement
4/8
घरातील जीवनावश्यक वस्तू देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे . शेती पाण्याखाली गेली आहे तर अनेक घरांमध्ये लोक अडकले आहेत
advertisement
5/8
बीडमध्ये एनडीआरएफ पाठोपाठ आता भारतीय सेनादलाची तुकडी दाखल झाली आहे.भारतीय सैन्य या पूरग्रस्तांचं रेस्क्यू करण्यासाठी दाखल झालंय.
advertisement
6/8
सिंदफणा नदीला आलेल्या महापुरामुळे बीड तालुक्यातील हिंगणी हवेली,नांदूर हवेली, कुर्ला गाव परिसराती लोक अडकल्याने भारतीय सैन्य दलाचे तुकडी बचाव करण्यासाठी दाखल झाली आहे.
advertisement
7/8
आठ दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे कडा शहर आणि परिसरातील सहा गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.
advertisement
8/8
त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कायम झाल्याने जे शिल्लक राहिलं ते ही या अतिवृष्टीने हिरावून घेतल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Beed Flood: बीडमध्ये आर्मी... शेतीची वाताहात, उभं पीक आडवं; महापुराचं रौद्ररुप, मन सुन्न करणारे फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल