महिलांमधे ऑस्टियोआर्थ्रायटिसचा धोका जास्त असतो. यामागचं मुख्य कारण हार्मोनल बदल आहेत. महिलांमधे इस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी कमी होते तेव्हा या वेदना जास्त जाणवतात. कुर्चाचं आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका इस्ट्रोजेनची असते. त्यामुळे इस्ट्रोजेनची कमतरता असेल तर सांध्यांची लवचिकता कमी होते आणि ऑस्टियोआर्थरायटिसचा म्हणजे अस्थिसंधिवाताचा धोका वाढतो.
Sleep : झोप नावाचं औषध, चांगल्या प्रकृतीसाठी किती तास झोप आवश्यक ? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
advertisement
महिलांमधे गुडघेदुखी - महिलांच्या शारीरिक रचनेमुळे या व्याधीची शक्यता जास्त असते. महिलांच्या सांध्यावर, विशेषतः गुडघे आणि कंबरेवर, जास्त ताण येतो. याव्यतिरिक्त, महिलांमधे सामान्यतः पुरुषांपेक्षा कमकुवत स्नायू असतात, ज्यामुळे सांध्यावर जास्त ताण येतो आणि कुर्चाची झीज होते.
कौटुंबिक इतिहास - ऑस्टियोआर्थ्रायटिसमधे अनुवांशिक संबंध देखील असतो. महिलांमधे याचा परिणाम जास्त जाणवतो. काही विशिष्ट जनुकांमुळे महिलांमधे ऑस्टियोआर्थरायटिस होण्याची प्रवृत्ती वाढते. कुटुंबातील महिलांना ही व्याधी असेल तर पुढच्या पिढीतील महिलांनाही अस्थिसंधिवात होण्याचा धोका जास्त असतो.
वृद्धत्व - ऑस्टियोआर्थ्रायटिस हा वृद्धत्वाशी संबंधित एक सामान्य आजार आहे. सहसा स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात म्हणून त्यांना जास्त धोका असू शकतो.
Periods : मासिक पाळीत घ्या विशेष काळजी, आहारातल्या बदलांमुळे वेदनाही होतील कमी
अस्थिसंधिवाताचा धोका टाळण्यासाठी काय करावं ?
नियमित व्यायाम करा. यात विशेषतः वजन उचलण्याचं व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात असलेला संतुलित आहार घ्या.
सांध्यांवर जास्त दबाव येऊ नये यासाठी वजन नियंत्रित ठेवा.
रजोनिवृत्तीनंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हार्मोन थेरपीचा विचार करा. सांध्यांच्या काळजीसाठी फिजिओथेरपी हा चांगला पर्याय आहे.
अस्थिसंधिवात ही व्याधी पूर्णपणे रोखता येत नाही, पण जागरूकता आणि खबरदारी घेतली तर धोका कमी करता येतो. महिलांनी सांध्याच्या आरोग्याबद्दल विशेष जागरूक असणं गरजेचं आहे आणि कोणतीही लक्षणं दिसली तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं उपचारांच्या दृष्टीनं आवश्यक आहे.