Periods : मासिक पाळीत घ्या विशेष काळजी, आहारातल्या बदलांमुळे वेदनाही होतील कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मासिक पाळीचे दिवस महिलांसाठी खूपच आव्हानात्मक असतात. काही महिलांना पाळी आधी आणि पाळी दरम्यान असह्य वेदना होतात. गरम पाण्याची पिशवी यासारख्या बाह्य उपायांबरोबरच आहारातले बदल महिलांसाठी उपयुक्त ठरतील.
मुंबई : मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांचं प्रमाण आणि रक्तस्राव प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत वेगवेगळं असतं. त्यामुळे या चार दिवसात नेहमीच्या धावपळीत या वेदनांसह काम करणं कष्टप्रद होतं.
मासिक पाळीचे दिवस महिलांसाठी खूपच आव्हानात्मक असतात. काही महिलांना पाळी आधी आणि पाळी दरम्यान असह्य वेदना होतात. काहींना तर वेदना इतक्या तीव्र होतात की बसणं किंवा उभं राहणं देखील कठीण होतं. वेदना कमी करण्यासाठी पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवण्याचा सल्ला देतात. या उपायांबरोबरच आहारातले बदल महिलांसाठी उपयुक्त ठरतील.
दर महिन्यातल्या या महत्त्वाच्या काळात काही डाएट टिप्स उपयोगी ठरतील. मासिक पाळीच्या पोटदुखीपासून आराम मिळू शकेल अशा काही गोष्टींचा आहारात समावेश करणं महत्वाचं आहे.
advertisement
जिरं आणि ओव्याचं पाणी - मासिक पाळीच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी, जिरं आणि ओवा घालून पाणी प्यावं. हे पाणी दिवसभर पिऊ शकता. यामुळे वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होतील.
हिरव्या भाज्या - हिरव्या भाज्या केवळ मासिक पाळीच्या तीव्र वेदनांपासून आराम देतात असं नाही तर एकूण आरोग्यासाठी देखील आवश्यक असतात. हिरव्या भाज्यांमुळे शरीरात लोहाची पातळी वाढते. थकवा आणि डोकेदुखी दूर करण्यासाठी देखील त्या उपयुक्त आहेत.
advertisement
डार्क चॉकलेट - डार्क चॉकलेट हे लोह आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. शिवाय, डार्क चॉकलेटमध्ये मूड वाढवणारे गुणधर्म असतात. कारण या काळात मूड स्विंग होऊ शकतात, ते कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट हा चांगला पर्याय आहे.
advertisement
हळदीचं दूध - हळदीचं दूध, ज्याला गोल्डन मिल्क असंही म्हणतात, मासिक पाळीच्या वेदना आणि मूड स्विंगपासून यामुळे आराम मिळतो.
केळी - मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी केळी हे प्रभावी फळ आहे. त्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी 6 पोटदुखी कमी करण्यासाठी मदत करू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 6:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Periods : मासिक पाळीत घ्या विशेष काळजी, आहारातल्या बदलांमुळे वेदनाही होतील कमी