Facial Hair : चेहऱ्यावरचे केस कमी करण्यासाठी नैसर्गिक पेय, फेस एक्स्पर्टनी दिलेत सोपे पर्याय

Last Updated:

महिलांमधे चेहऱ्यावरील केस वाढण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे संप्रेरकांचं असंतुलन आणि अँड्रोजन हार्मोन्सची वाढलेली पातळी. PCOS सारख्या समस्या असलेल्या महिलांमधे चेहऱ्यावरील आणि शरीरावरील केसांची वाढ जास्त होते. काही नैसर्गिक पर्यायांनी हे प्रमाण कमी करता येईल.

News18
News18
मुंबई : वॅक्सिंग, थ्रेडिंग हे पर्याय नेहमीच्या वापरातले असतात. चेहऱ्यावरच्या केसांसाठीही थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केलं जातं पण तरीही काहीवेळा हे पर्याय प्रभावी ठरत नाहीत. चेहऱ्यावरचे केस कमी करण्यासाठी लेसर उपचारही केले जातात.
जास्त खर्च आणि वेदना टाळण्यासाठी या पर्यायांव्यतिरिक्त काही पर्याय आहेत. चेहऱ्यावरचे केस आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी फेस योग तज्ज्ञ मानसी गुलाटी यांनी इंस्टाग्रामवर नैसर्गिक पेयं शेअर केली आहेत.
महिलांमधे चेहऱ्यावरील केस वाढण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे संप्रेरकांचं असंतुलन आणि अँड्रोजन हार्मोन्सची वाढलेली पातळी. PCOS सारख्या समस्या असलेल्या महिलांमधे चेहऱ्यावरील आणि शरीरावरील केसांची वाढ जास्त होते.
advertisement
चेहऱ्यावर थोडे केस असतातच पण पुरुषांसारखे दाट आणि जास्त वाढले तर ते काही वेळा वॅक्सिंग, थ्रेडिंगनं निघत नाहीत. थ्रेडिंग आणि वॅक्सिंग - हा पर्याय उपयुक्त असला तरी काहींसाठी वेदनादायक ठरु शकतो. फेशियल रेझर - सोपा पर्याय आहे, पण अयोग्य वापरामुळे केस जाड येऊ शकतात. लेझर उपचार - कायमस्वरूपी उपाय असला तरी खूप महाग पर्याय आहे.
advertisement
फेस योगा तज्ञ मानसी गुलाटी म्हणतात की, चेहऱ्यावरील नको असलेले केस कमी करण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी काही खास पेयं घ्यावीत.
काळी मिरी - एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर काळी मिरी घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. चेहऱ्यावरच्या केसांची वाढ कमी करण्यात मदत होते. चयापचयाचा वेग वाढतो. डिटॉक्स आणि वजन कमी करण्यासाठीही हा पर्याय फायदेशीर आहे.
advertisement
हळदीचं पाणी - एक ग्लास पाणी चिमूटभर हळद मिसळून प्या. रंगद्रव्य आणि काळे डाग कमी करणं, आणि नैसर्गिक चमक आणण्यासाठी हा प्रभावी पर्याय आहे.
हिमालयीन मीठ - कोमट पाण्यात हिमालयन सॉल्ट घालून ते प्या. यामुळे मुरुमांचं प्रमाण कमी होतं. त्वचा स्वच्छ राहते.
या पेयांमुळे चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी होते तसंच त्वचेचं अंतर्गत आरोग्यही यामुळे सुधारतं, या पेयांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारतं आणि त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि चमकदार दिसते.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Facial Hair : चेहऱ्यावरचे केस कमी करण्यासाठी नैसर्गिक पेय, फेस एक्स्पर्टनी दिलेत सोपे पर्याय
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement