Buldhana : नळगंगा धरण भरल्यानं अचानक मोठा विसर्ग, नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिक रस्त्यावर
- Published by:Suraj
Last Updated:
(राहुल खंडारे, बुलढाणा प्रतिनिधी) नळगंगा धरण भरल्यानं अचानक विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
1/5

बुलढाण्यातील नळगंगा धरण पूर्ण भरलं असून अचानक धरणातून विसर्ग केल्यानं दाताला गावात पूरस्थिती निर्माण झालीय.
advertisement
2/5
धरणाचे पाणी घरात घुसल्यानं गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. जवळपास ६०० ते ७०० लोकांच्या घऱात पाणी घुसलं आहे.
advertisement
3/5
घरात पाणी घुसल्यानं लोक जीवनावश्यक साहित्य घेऊन घरातून बाहेर पडले आहेत. काहींचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले.
advertisement
4/5
नळगंगा धरणातून पाणी सोडल्यानं नदीला पूर आला असून नदीकाठच्या ग्रामस्थांची घरे पाण्यात गेली आहेत.
advertisement
5/5
दाताला गावातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू इतरत्र हलवण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, नागरिकांनी बसस्थानक परिसरात रास्तारोको केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana : नळगंगा धरण भरल्यानं अचानक मोठा विसर्ग, नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिक रस्त्यावर