TRENDING:

Money Saving Tips : घरातली कोणती इलेक्ट्रिक वस्तू जास्त वीज वापरते माहितीये? 'या' टिप्स वाचवतील तुमचे पैसे

Last Updated:
Electricity bill reducing tips : आपल्या घरामध्ये अनेक इलेक्टरी वस्तू असतात. त्यांपैकी, फॅन, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन हे आजकाल प्रत्येक घरामध्ये असतेच. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या घरातील सर्व इलेक्ट्रिक वस्तूंपैकी कोणती वस्तू जास्त वीज वापरते. चला जणू घेऊया.
advertisement
1/7
कोणती इलेक्ट्रिक वस्तू जास्त वीज वापरते माहितीये? 'या' टिप्स वाचवतील तुमचे पैसे
एसी : मार्चपासून उन्हाची तीव्रता वाढली की, घरात एसीचा वापर वाढतो. तज्ञांच्या मते, एक सामान्य 1.5 टन एसी सुमारे 1500 ते 2000 वॅट वीज वापरू शकतो. जर तो दिवसाला 6 ते 8 तास चालवला गेला, तर वीज बिलात खूप वाढ होऊ शकते. विशेषतः जर तापमान खूप कमी म्हणजेच 18-20 अंश इतके सेट केले गेले असल्यास. कारण यामुळे कंप्रेसर जास्त काळ चालतो आणि जास्त वीज वापरतो.
advertisement
2/7
तुम्हाला जर एसीचे वीजबिल कमी करायचे असेल तर एसीचे तापमान 24 ते 26 अंशांच्या दरम्यान ठेवा. खोली व्यवस्थित बंद ठेवा, सूर्यप्रकाश येऊ नये म्हणून पडदे वापरा. इन्व्हर्टर तंत्रज्ञानाचा एसी निवडा, जो सामान्य एसीपेक्षा कमी वीज वापरतो.
advertisement
3/7
वॉटर हीटर : हिवाळ्यात वॉटर हीटर किंवा गीझरचा वापर वाढतो आणि यामुळे वीजबिल वाढते. तज्ञांच्या मते, एक सामान्य वॉटर हीटर 2000 ते 3000 वॅट वीज वापरू शकतो. जर ते बराच वेळ चालू ठेवले किंवा पाणी गरम केल्यानंतरही स्विच बंद केला नाही तर युनिट्स वेगाने वाढतात.
advertisement
4/7
तुम्हाला हिटरमुळे वाढणारे वीजबिल कमी कार्याचे असेल तर गीझर कमी वापर. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी गरम होताच ते बंद करा. चांगल्या दर्जाची इन्सुलेटेड टाकी असलेले मॉडेल निवडा, जेणेकरून गरम पाणी जास्त काळ थंड होणार नाही. टायमर असलेला गीझर वापरा जेणेकरून ते आपोआप बंद होईल.
advertisement
5/7
वॉशिंग मशीन : वॉशिंग मशीन दिवसभर चालत नसले, तरी त्याची मोटर आणि हीटिंग सिस्टम खूप वीज वापरते. विशेषतः हॉट वॉश मोड किंवा ड्रायर मोड वापरल्याने जास्त वीज लागते. रोज लहान कपडे धुण्याऐवजी एकाच वेळी पूर्ण लोडमध्ये कपडे धुणे जास्त फायदेशीर आहे.
advertisement
6/7
वाशिंग मशीनचे बिल कमी करायचे असेल तर आठवड्यातून फक्त 2-3 वेळा नियोजन करून वॉशिंग मशीन वापरा. ड्रायर मोड जास्त वेळा चालवल्यानेही बिल वाढते. कपडे पूर्ण भरून धुवा आणि कोल्ड वॉश मोड वापरा.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Money Saving Tips : घरातली कोणती इलेक्ट्रिक वस्तू जास्त वीज वापरते माहितीये? 'या' टिप्स वाचवतील तुमचे पैसे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल