TRENDING:

Marathwada Rain: मराठवाड्याला पुन्हा अलर्ट, आजचा हवामान अंदाज पाहूनच करा रविवारचं नियोजन

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढल आहे. आज रविवारी पुन्हा 6 जिल्ह्यांना सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/5
मराठवाड्याला पुन्हा अलर्ट, आजचा हवामान अंदाज पाहूनच करा रविवारचं नियोजन
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अधूनमधून हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार आज 10 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. 
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहणार असून दुपारनंतर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतातील कामकाजादरम्यान विशेष काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने आवाहन केले आहे. 
advertisement
3/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मराठवाड्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचा प्रभाव उद्या स्पष्ट जाणवेल. पुढील तीन ते चार दिवस पावसाची हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज असून या काळात अधूनमधून ढगाळ वातावरण, दमट उकाडा आणि हलका पाऊस असा क्रम सुरू राहण्याची शक्यता आहे. 
advertisement
4/5
या पावसामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा त्रास जाणवत असलेल्या नागरिकांनाही पावसामुळे दिलासा मिळत आहे. मात्र विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
5/5
भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी हवामान विभागाचे अंदाज अपडेट होत आहेत. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करत पुढील दोन ते तीन दिवसांसाठी शेतीय कामकाजाचे नियोजन करावे, असा सल्ला दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: मराठवाड्याला पुन्हा अलर्ट, आजचा हवामान अंदाज पाहूनच करा रविवारचं नियोजन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल