TRENDING:

Weather Alert: विजा कडाडणार, वारे वाहणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. आज मात्र छत्रपती संभाजीनगरसह 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
विजा कडाडणार, वारे वाहणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
राज्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पावसासह ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळतो. आज मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 सप्टेंबर रोजीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
विजा कडाडणार, वारे वाहणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांना आज 4 सप्टेंबर रोजी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या काळात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊ शकतो. तसेच वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्याबरोबरच 30-40 किमी ताशी वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
advertisement
3/5
परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ वातावरण राहणार असून ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी मात्र मराठवाड्यातील पावसाची तीव्रता कमी होणार असून कोणत्याही जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा नाही.
advertisement
4/5
सोयगाव व सिल्लोड तालुक्यात गेल्या 48 तासांत जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे फर्दापूर येथील वाघूर नदीला पूर आला असून बनोटी, जरंडी येथील धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. अधिकच्या पावसाने पिके पाण्याखाली गेले असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/5
मराठाड्यात गेल्या काही काळात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दिलासा मिळाला आहे. परंतु, काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. आता पावसाचा जोर ओसरणार असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: विजा कडाडणार, वारे वाहणार, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल