Marathwada Rain: ताशी 40 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यात धो धो कोसळणार, 48 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 48 तासांसाठी सर्व जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/5

मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन झाले असून जोर वाढत आहे. आता भारतीय हवामान विभागाने 8 ऑगस्ट रोजी संपूर्ण मराठवाड्यासाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
2/5
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो. यामुळे नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
3/5
छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जास्त प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये वीज कोसळण्याचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
advertisement
4/5
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर मात्र हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे.
advertisement
5/5
आता सुरू असलेल्या खरीप हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर असला, तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. विशेषतः तूर, सोयाबीन व भात पिकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. गरज असल्यास मदत व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. हवामान खात्याचे पुढील अपडेट नियमितपणे तपासावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain: ताशी 40 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यात धो धो कोसळणार, 48 तासांसाठी अलर्ट