Weather Forecast: परतीचा पाऊस सहज जाईना, मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, अनेक जिल्हे अलर्टवर!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:APURVA PRADIP TALNIKAR
Last Updated:
Marathwada rains: मुंबई, कोकण, पुणेपाठोपाठ यंदा विदर्भ आणि मराठवाड्याला पावसानं जोरदार तडाखा दिला. पावसानं इथं पार दैना उडवली. सप्टेंबरच्या सुरूवातीलाही दमदार कोसळल्यानंतर अगदी काहीच दिवस पावसानं उसंत घेतली, मात्र त्यानंतर पुन्हा परतीच्या पावसाचा जोर वाढला. हवामान विभागानं आतादेखील मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर)
advertisement
1/5

छत्रपती संभाजीनगर शहरात आज, 30 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. आज इथलं कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 32 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.
advertisement
2/5
पैठणच्या नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. 1 फुटानं हे दरवाजे उघडले असून त्यातून 18864 क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या 400 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/5
शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलावही ओव्हर फ्लो झाला. पाण्याचं अक्राळविक्राळ रूप पाहण्यासाठी इथं नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अशात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
advertisement
5/5
पावसाचा इशारा देण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. यंदाच्या पावसानं आधीच पिकांचं प्रचंड मोठं नुकसान केलंय. तसंच वातावरण बदलताच साथीचे आजार झपाट्यानं पसरतात, त्यामुळे नागरिकांनी आपापलं आरोग्य जपायला हवं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Forecast: परतीचा पाऊस सहज जाईना, मराठवाड्यात पुन्हा मुसळधार, अनेक जिल्हे अलर्टवर!