'या जन्मात तुझं दर्शन घेणार नाही', म्हणणारी मराठी अभिनेत्री 4 महिन्यातच पोहोचली विठ्ठलाच्या चरणी, असं काय झालं ज्यामुळे देवालाही नाकारलं
- Reported by:Virendrasigh Utpat
- Written by:Minal Gurav
Last Updated:
पंढरपूरला न जाण्याची शपथ घेतलेली अभिनेत्री. चार महिन्यातच विठ्ठलाच्या चरणी गेली. असं काय घडलं ज्यामुळे अभिनेत्रीनं देवालाही नाकारलं होतं.
advertisement
1/8

उभ्या जन्मात पंढरपूरला जाणार नाही. असा निश्चय करणाऱ्या मराठी अभिनेत्रीनं चार महिन्यातच विठ्ठलाच्या चरणी जात दर्शन घेतलं आहे. अभिनेत्रीनं अशी शपथ का घेतली होती.
advertisement
2/8
आपण बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे नेहा दांडेले. पुष्पा इम्बपॉसिबल या मालिकेतून नेहा घराघरात पोहोचली. नेहाच्या आईच्या आईच्या मृत्यू समय विठ्ठल धावून आला नाही हा राग नेहाच्या मनात होता. पण वर्षभराच्या आतच विठ्ठलानं तिला बोलावून घेतलं.
advertisement
3/8
अभिनेत्री नेहा दांडेले म्हणाली, "आम्ही वारकरी संप्रदायाची माणसी. माझी आई विठ्ठलभक्त. उठता बसता तिच्या तोंडी विठ्ठलाचं नाव. मी आईला म्हणायचे तू का इतकं विठ्ठल विठ्ठल करते. ती मला म्हणायची, माझं विठ्ठल रुक्मिणीवर प्रचंड प्रेम आहे. देवावर निस्वार्थपणे प्रेम करावं, वाईट प्रसंगी तो धावून येतो असं माझी आई नेहमी सांगायची."
advertisement
4/8
"2024 ला माझ्या आईला ब्रेक स्ट्रोक आला. ती चार महिने कोमात होती. त्या काळात मी विठ्ठलाचा धावा केला. तुझी भक्ती पडलीये तिथे तिला वाचव. या काळात मी पुष्पा इम्पॉसिबलचं शूट करत होते, दोन सिनेमे होते ते सगळं सोडून मी चार महिने नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये आईसोबत होते. चोवीस तास माझ्या तोंडी विठ्ठलाचं नाव."
advertisement
5/8
"2024 च्या देवउठणी एकादशीच्या दिवसी आईने प्राण सोडले. मी विठ्ठलाला म्हटलं, तिला वरती जाण्याआधी तिला उठवलं का नाहीस. मी इतके रडले, इतके चिढले. मी शपथ घेतली, या जन्मी तुझ्यादारी येणार नाही. मी पंढरपूरला येणार नाही. तो का नाही धावून आला."
advertisement
6/8
नेहा पुढे म्हणाली, "आता आम्ही तुळजापूरला आमच्या कुलदैवतेला गेले होतो आणि अचानक घरच्यांची इच्छा झाली की आम्हाला पंढरपूरला जायचं आहे. मी म्हटलं मी येणार नाही. ते मला म्हणाले, तू चल, बाहेरून दर्शन कर. पण अशी परिस्थिती निर्माण झाली. मी विठ्ठलाच्या पायाशी डोकं ठेवलं. जो तुळशी हार घेऊन गेले तो त्याच्या गळ्यात होता. माझी आई एकादशीला त्यांना सुंदर कपडे चढवायची. रुक्मिणीला सोन्याचं मंगळसूत्र असायचं. आई कोमात गेली त्यामुळे ते मागच्या वर्षीपासून राहून गेलं होतं ते सगळं आता चढवण्यात आलं."
advertisement
7/8
"मला कळत नव्हतं हे सगळं काय सुरू आहे. हे आम्ही ठरवतो ते होत नाही. पण त्याने ठरवलंय ते होतं. मी खूप रडले. माझे घरचे म्हणाले, तू शपथ घेतली होतीस ना या जन्मात येणार नाही. जन्म सोड तू वर्षभरात तुझं डोकं त्याच्या पायावर होतं. मला त्याने त्याच्या चरणी आणलंय. मी त्याची क्षणी मागते, रागत खूप काही बोलले. जे काही मी चुकून बोलले त्यासाठी मला माफ कर. इथून पुढे माझ्या हातून चांगला भक्तीप्रवास घडो. मला चांगला मार्ग दाखव. सद्बुद्धी दे."
advertisement
8/8
"आपण ठरवलेलं होतं नाही. विधात्याने सगळं ठरवलेलं असतं. मी शपथ घेतली होती या जन्मात मी येणार नाही पण त्याला वर्षभरात त्याच्या पायाशी आणलंय मला. जन्माला आलेल्या सगळ्यांना जायचं आहे. जी बाई चार महिने मृत्यूशी झुंज देत होती तिला एकादशीला मरण कसं आलं. सगळे असं म्हणतात, एकादशीला ज्याचे प्राण जातात ते थेट वैंकुठात जातात. हे जर सत्य असेल तर माझी आई वैंकुठात आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'या जन्मात तुझं दर्शन घेणार नाही', म्हणणारी मराठी अभिनेत्री 4 महिन्यातच पोहोचली विठ्ठलाच्या चरणी, असं काय झालं ज्यामुळे देवालाही नाकारलं