आजचं हवामान: मराठवाड्यात उष्णतेची लाट, 72 तासांसाठी अलर्ट, संभाजीनगरमध्ये काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Weather: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 2 दिवसांत पुन्हा हवापालट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/5

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळत आहे. गुरुवारी (1 मे) दिवसभर तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते आणि रात्री उशिरापर्यंत हवामान उष्ण राहिले. सध्या आकाश काही अंशी ढगाळ असून उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ही स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
शुक्रवारी (2 मे) तापमान आणखी वाढून 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तरीही काही भागांत आकाश ढगाळ राहणार आहे. यामुळे गरम वातावरणात थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुपारच्या वेळात उन्हाचा त्रास अधिक जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
advertisement
3/5
शनिवारी (3 मे) देखील हवामानात फारसा बदल अपेक्षित नाही. तापमान 42 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असून, आकाश ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा पश्चिम व उत्तर-पश्चिमेकडून असणार आहे आणि वाऱ्याचा वेग 9 ते 19 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णता आणि दमटपणाचा अनुभव राहणार आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कमाल तापमान 42 अंश तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे. 3 मेला अंशत: ढगाळ तर 4 मेला पुन्हा वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/5
हिंगोली, परभणी, बीड, लातूर, संभाजीनगर, नांदेड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक राहील. विशेषतः दुपारच्या वेळेस उन्हापासून स्वतःचं संरक्षण करणे आवश्यक आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारी घराबाहेर जाणे टाळावे. शेतकरी वर्गाने देखील पीकांचे संरक्षण करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे. प्रशासनाकडून उष्णतेबाबत सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आजचं हवामान: मराठवाड्यात उष्णतेची लाट, 72 तासांसाठी अलर्ट, संभाजीनगरमध्ये काय स्थिती?