आजचा दिवस पावसाचाच! मराठवाड्याला पुन्हा यलो अलर्ट, काय आहे अपडेट?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
राज्यात गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावलीये. मराठवाड्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून आज पुन्हा यलो अलर्ट देण्यात आलाय.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या धुमाकूळ सुरू आहे. मराठवाड्यात देखील मागील 8 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज, 27 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पावसाची स्थिती कायम राहील.
advertisement
2/5
मराठवाड्यात आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उद्यापासून मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीये.
advertisement
3/5
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून नांदेडमध्ये मध्यम तर लातूर आणि धाराशिवमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.
advertisement
4/5
मागील काही दिवसांत झालेल्या पावसानं मराठवाड्यातील धरणपातळीत वाढ झाली असून जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले होते. तर मराठवड्यातील बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दिलासा मिळाला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला सोयाबीन अनेक ठिकाणी शेतातच पडून आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्याचे चित्र आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आजचा दिवस पावसाचाच! मराठवाड्याला पुन्हा यलो अलर्ट, काय आहे अपडेट?