Marathwada Weather Update: काळजी घ्या! थंडीनं गारठलं परभणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय स्थिती? पाहा आजचं हवामान
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यातील हवामान मुख्यतः स्थिर राहणार असले तरी सकाळी काही प्रमाणात थंडी जाणवेल. हवामानातील संभाव्य बदलांसाठी नागरिकांनी अधिकृत हवामान अंदाजांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरते.
advertisement
1/5

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाचा कोणताही अंदाज नाही.
advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये हवामान सौम्य आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. इथे कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल तर किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दिवसभर ऊन तर रात्री थोडा गारवा जाणवेल. या भागांमध्ये शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी योग्य ती काळजी घ्यावी.
advertisement
3/5
बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता असून हवामान सौम्य आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. इथे तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तर रात्रीचे तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान असेल.
advertisement
5/5
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवेल. दिवसाचे तापमान 31 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल तर रात्रीचे तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान असेल. या भागांमध्ये उन्हामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Weather Update: काळजी घ्या! थंडीनं गारठलं परभणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय स्थिती? पाहा आजचं हवामान