TRENDING:

Weather Alert: रविवारी वारं फिरलं, डिसेंबरअखेर टेन्शन वाढलं, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: डिसेंबरअखेर महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची शक्यता आहे. 28 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
रविवारी वारं फिरलं, डिसेंबरअखेर टेन्शन वाढलं, हवामान विभागाचा अलर्ट
उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा अधिक जाणवणार आहे. विशेषतः पुणे आणि राज्याच्या अंतर्गत भागांत थंडीचा जोर कायम राहणार आहे. मुंबई–ठाणे परिसरात थंडी सौम्य असली तरी सकाळी गारवा जाणवेल. त्यामुळे आज मुंबईसोबत कोकण किनारपट्टी आणि इतर भागात चांगलीच हुडहुडी भरणार आहे. रविवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे. दिवसभर आकाश निरभ्र राहील, मात्र सकाळी आणि उशिरा रात्री थंड हवा जाणवू शकते. मुंबईत किमान तापमान सुमारे 18 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही अशीच परिस्थिती राहील. कोकण किनारपट्टी भागात थंडी फार तीव्र नसली तरी गारवा कायम राहणार आहे.
advertisement
3/5
पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात मात्र थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. आज पुण्यात किमान तापमान सुमारे 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली राहणार असून सकाळच्या वेळी हुडहुडी भरणारी थंडी जाणवेल. पुण्याच्या ग्रामीण भागात गारठा आणखी तीव्र असण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर भागांतही किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
उत्तर महाराष्ट्रात काही भागांत थंडीचा जोर कायम असला तरी काही जिल्ह्यांत गारवा थोडा कमी झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात आजही कडाक्याची थंडी जाणवेल, किमान तापमान सुमारे 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार भागांत मात्र मागील दिवसांच्या तुलनेत थंडी किंचित कमी झाली आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातही थंड हवामान कायम राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान सुमारे 11 अंश सेल्सिअस, तर नांदेडमध्ये 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. या भागांत केवळ सकाळीच नव्हे तर दुपारच्या वेळीही गारवा जाणवत असून कमाल तापमानातही घट झाल्याचे दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: रविवारी वारं फिरलं, डिसेंबरअखेर टेन्शन वाढलं, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल