TRENDING:

Facebook, Instagram आपल्या ओळखीच्या लोकांना Friend Suggestion मध्ये कसं दाखवतं?

Last Updated:
Social Media Friend Suggestion : Facebook आणि Instagram हे सोशल मीडिया अॅप आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कसे काय ओळखतात? आपलं गुप्तपणे ऐकत असतात का? की यामागे काही वेगळी टेक्नॉलॉजी आहे?
advertisement
1/9
Facebook, Instagram आपल्या ओळखीच्या लोकांना Friend suggestion मध्ये कसं दाखवतं?
फेसबुक, इन्स्टाग्राम तर सगळेच वापरतात. त्यामध्ये एक गोष्ट तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडिया उघडलं की तुम्हाला People You May Know किंवा Suggested for You असे पर्याय दिसतात. तिथं अचानक आपल्याला ओळखीचे लोक दिसतात. कधी शेजारी, कधी ऑफिसमधील सहकारी, तर कधी एखादी व्यक्ती जिला आपण नुकतेच भेटलेलो असतो. तेव्हा लगेच प्रश्न पडतो, हे सोशल मीडिया अॅप आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कसे काय ओळखतात?
advertisement
2/9
फ्रेंड्स सजेशनमागील सगळ्यात मोठं कारण म्हणजे म्युच्युअल फ्रेंड्स. जर तुमचं आणि एखाद्या व्यक्तीचं एकाच मित्राशी कनेक्शन असेल तर फेसबुक, इन्स्टाग्रामला वाटतं की तुम्ही एकमेकांना ओळखत असण्याची शक्यता जास्त आहे. जितके जास्त Mutual friends, तितकी Suggestion येण्याची शक्यता जास्त.
advertisement
3/9
आपण अनेकदा App इन्स्टॉल करताना Contacts access ला Allow करतो. त्यामुळे तुमच्या फोनमधील नंबर, ईमेल आयडी फेसबुक, इन्स्टाग्रामच्या सर्व्हरला sync होतात. जर त्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तीचा नंबर फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंटला जोडलेला असेल, तर तो लगेच सजेशनमध्ये दिसू शकतो.
advertisement
4/9
जर तुम्ही आणि समोरची व्यक्ती एकाच ठिकाणी एकाच वायफाय नेटवर्कवर काही वेळ ऑनलाईन असाल तर अल्गोरिदमला सिग्नल मिळतो की तुम्ही फिजिकली जवळ होता. म्हणूनच पार्टी किंवा लग्नानंतर अनेक नवीन फ्रेंड सजेशन दिसतात.
advertisement
5/9
फेसबुक इन्स्टाग्राम हे अधिकृतरित्या मान्य करत नाहीत. पण तुम्ही एखाद्याचं प्रोफाईल वारंवार सर्च केलं किंवा उघडलं तर अल्गोरिदम त्याला Interest signal मानतो. त्यामुळे त्या व्यक्तीला सजेशनमध्ये आणण्याची शक्यता वाढते.
advertisement
6/9
जर तुम्ही सारखे पेस लाइक केले, सारखे इन्स्टाग्राम क्रिएटर्स फॉलो केले, एकाच फेसबुक ग्रुपमध्ये असाल तर सिस्टम समजतो की तुमचं सोशल सर्कल ओव्हरलॅप होतं. म्हणून फ्रेंड सजेशनमध्ये प्रत्यक्ष ओळख नसली तरी ती व्यक्ती फ्रेंड सजेशनमध्ये येते.
advertisement
7/9
टॅग फोटो, एकाच ठिकाणी अपलोड केलेले फोटो, एकाच इवेंटला इंटरेस्टेड किंवा गेलेले फोटो हे सगळं अल्गोरिदमसाठी स्ट्राँग क्लू असतं. त्यामुळे त्या इवेंटमधील लोक सजेशनमध्ये दिसू शकतात.
advertisement
8/9
फेसबुक, इन्स्टाग्राम पूर्णपणे AI-based algorithms वापरतात. हे अल्गोरिदम तुम्ही कुणाला फॉलो करता, कुणाची रिक्वेस्ट एक्सेप्ट करता, कुणाला इग्नोर करता हे सतत शिकत असतं, यावरून ते पुढचे सजेशन ठरवतात.
advertisement
9/9
मग फेसबुक, इन्स्टाग्राम आपल्याला ऐकत असतं का? तर नाही,  ते थेट आपली संभाषणं ऐकत नाहीत. पण आपली एक्टिव्हिटी, लोकेशन, कॉन्टॅक्ट्स, ऑनलाईन वर्तणूक यातून आपल्याला ओळखण्याचा illusion तयार करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Facebook, Instagram आपल्या ओळखीच्या लोकांना Friend Suggestion मध्ये कसं दाखवतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल