TRENDING:

उद्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण, 'या' लोकांना राहावं लागणार सावध; एका राशीच्या लोकांना करावा लागणार संकटांचा सामना!

Last Updated:
17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. हे एक 'कंकणाकृती सूर्यग्रहण' असून अवकाशात 'रिंग ऑफ फायर' सारखे अद्भूत दृश्य पाहायला मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते, कारण त्याचा थेट परिणाम निसर्ग आणि मानवी जीवनावर होत असतो.
advertisement
1/7
Surya Grahan : उद्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण, 'या' लोकांना राहावं लागणार सावध
17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. हे एक 'कंकणाकृती सूर्यग्रहण' असून अवकाशात 'रिंग ऑफ फायर' सारखे अद्भूत दृश्य पाहायला मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते, कारण त्याचा थेट परिणाम निसर्ग आणि मानवी जीवनावर होत असतो.
advertisement
2/7
यंदाचे हे ग्रहण कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात होत आहे. शास्त्रानुसार, काही विशिष्ट व्यक्तींना आणि कुंभ राशीच्या जातकांना या काळात विशेष खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/7
हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत दिसणार आहे. भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्याने येथे 'सूतक काळ' पाळण्याची धार्मिक गरज नाही, असे पंचांगकर्त्यांचे मत आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहांची स्थिती संपूर्ण पृथ्वीवर प्रभाव टाकत असते, त्यामुळे संवेदनशील व्यक्तींनी सावध राहणे केव्हाही उत्तम.
advertisement
4/7
गरोदर महिलांसाठी खबरदारी: धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा वाढते. गरोदर महिलांनी या काळात घराबाहेर पडणे टाळावे. ग्रहण काळात धारदार वस्तू वापरू नयेत. शांत बसून नामस्मरण करावे, जेणेकरून बाळावर सकारात्मक संस्कार होतील.
advertisement
5/7
लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती: लहान मुले आणि वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. ग्रहणाच्या प्रभावामुळे त्यांच्या पचनसंस्थेवर किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांना या काळात जड अन्न देऊ नये आणि घराबाहेर पाठवू नये.
advertisement
6/7
आजारी व्यक्तींसाठी सूचना: ज्यांना हृदयविकार, रक्तदाब किंवा मानसिक तणावाचा त्रास आहे, त्यांनी ग्रहण काळात औषधे वेळेवर घ्यावीत आणि शांत झोपावे. विनाकारण भीती बाळगू नये, पण शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवावे.
advertisement
7/7
कुंभ राशीच्या लोकांसाठी 'अ‍ॅलर्ट': हे ग्रहण कुंभ राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी काळ आव्हानात्मक आहे. आरोग्य समस्या, कामात अडथळे किंवा मानसिक गोंधळ होऊ शकतो. घाईघाईत कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना सावध राहा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उद्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण, 'या' लोकांना राहावं लागणार सावध; एका राशीच्या लोकांना करावा लागणार संकटांचा सामना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल