T20 World Cup 2026 मध्ये पुन्हा होणार India vs Pakistan मॅच? आत्ताच लिहून ठेवा तारीख
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs PAK Match Again in T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्स पुन्हा आमनेसामने येऊ शकतात का? भारताने पाकिस्तानचा 61 रन्सने पराभव केल्यामुळे चाहत्यांना आता पुन्हा एकदा या दोन देशांमधील सामना पाहण्याची ओढ लागली आहे.
advertisement
1/7

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 15 फेब्रुवारीच्या रोमहर्षक सामन्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आता एकाच प्रश्नाची चर्चा सुरू आहे.
advertisement
2/7
या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्स पुन्हा आमनेसामने येऊ शकतात का? भारताने पाकिस्तानचा 61 रन्सने पराभव केल्यामुळे चाहत्यांना आता पुन्हा एकदा या दोन देशांमधील सामना पाहण्याची ओढ लागली आहे.
advertisement
3/7
असं असतानाच आता पाकिस्तान पुन्हा भारताविरुद्ध खेळण्याची तयारी करत आहे. सध्याच्या गणितानुसार, आयसीसीने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी जे शेड्युल ठरवलं आहे, त्यानुसार सुपर 8 मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार नाहीत.
advertisement
4/7
भारतीय टीमला 'X1' सीडिंगसह ग्रुप 1 मध्ये ठेवले जाईल, तर पाकिस्तानला 'Y3' सीडिंगसह ग्रुप 2 मध्ये स्थान मिळेल. म्हणजेच, सुपर 8 फेरीत या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत होणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. पण पाकिस्तानने ठरवलं तर हा सामना होऊ शकतो.
advertisement
5/7
भारत निर्विवाद सुपर 8 फेरीनंतर सेमीफायनल खेळेल. टीम इंडियाला सेमीफायनल गाठणं कठीण असणार नाही. तर पाकिस्तानने आपला खेळ उंचावला अन् पाकिस्तानचा संघ सेमीफायनल गाठू शकतो.
advertisement
6/7
जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्सनी आपापल्या ग्रुपमधून सेमीफायनल गाठली, तरच पुन्हा एकदा ही लढत पाहायला मिळू शकते. 4 मार्च रोजी हा सामना होण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहोचू शकली नाही किंवा सुपर 8 मधून बाहेर पडली तर पुन्हा मौका मौका करण्याची संधी मिळणार नाही. पाकिस्तानच्या संघात एवढी ताकद नाही की ती सेमीफायनलपर्यंत पोहोचले, अशी चर्चा सुरू झालीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 मध्ये पुन्हा होणार India vs Pakistan मॅच? आत्ताच लिहून ठेवा तारीख