छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाची खास सोन्याची 'होन' नाणी, पाहा दुर्मिळ Photos
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : अखंड महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर जल्लोषात शिवजयंती साजरी केली जातीये.
advertisement
1/6

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी खास सोन्याची 'होन' नाणी तयार करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही 'होन' नाणी अतिशय दुर्मिळ असून आतापर्यंत केवळ 5 ते 6 होन उपलब्ध झाली आहेत.
advertisement
2/6
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवराई आणि होन या दोन नाण्यांना मोठं महत्त्व आहे. शिवराई हे तांब्यापासून तयार केलं जात होतं. तर सोन्यापासून होन चलन तयार केलं जात होतं.
advertisement
3/6
छत्रपती शिवाजी महाराज यांची 'होन' नाणी दुर्मिळ आहेत. त्यापैकी 3 सुवर्ण होन नागपुरातील नाणी संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांचेकडे आहेत. या नाण्यावर एका बाजूला 'श्री राजा शिव' तर दुसऱ्या बाजूला 'छत्रपती' असा मजकूर लिहिला आहे.
advertisement
4/6
सुमारे 3 ग्राम वजनाच्या या होन नाण्यांचा व्यास 1.2 सेंटीमीटर एवढा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या एक दिवसअगोदर सुवर्ण होन तुला करण्यात आली होती.
advertisement
5/6
रायगडावर झालेल्या भव्यदिव्य राज्याभिषेकाला आलेल्या अनेक गणमान्य व्यक्ती, सरदार, मंत्री यांना हे सुवर्ण होन शिवाजी महाराजांनी स्वतः आपल्या हाताने दान केलं होतं.
advertisement
6/6
त्यामुळे या सुवर्ण होनला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातांचा स्पर्श झाल्याचं नाणी संग्राहक अशोक सिंह ठाकूर सांगतात. त्यामुळे ही नाणी खास आहेत, असंही ते सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाची खास सोन्याची 'होन' नाणी, पाहा दुर्मिळ Photos