Ladki Bahin Yojana: 2100 मिळणार की 1500 जाणार? नवे मुख्यमंत्री काय म्हणाले?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नविन सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या तासाभरातच लाडकी बहीण योजनेवर सगळं काही स्पष्टपणे सांगितले आहेत.
advertisement
1/5

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत. दरमहिन्याला 2100 रुपये आम्ही देणार आहोत. बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले.
advertisement
2/5
जी आश्वासने दिली ती पू्र्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्था आम्ही करु, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
advertisement
3/5
लाडकी बहीण योजनेचा लाभ निकषाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यावर विचार करावा लागेल. जो निकषात बसते त्यांचे कोणाचे काढून घेतले जाणार नाही.
advertisement
4/5
शेतकरी सन्मान योजना सुरू केली त्यावेळी त्याचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांनी देखील घेतला. तर हे लक्षात आल्यानंतर त्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वत: सांगितले आम्ही निकषात बसत नाही. त्यानंतर ती योजना स्थिर झाली.
advertisement
5/5
या योजनेत काही निकषात बसत नाही अशा बहिणी आहेत तर त्यांचा पुर्नविचार करू पण सरसकट सगळ्यांचा विचार केला जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ladki Bahin Yojana: 2100 मिळणार की 1500 जाणार? नवे मुख्यमंत्री काय म्हणाले?