TRENDING:

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत मोठी कारवाई! लाखोंचं बक्षिस असलेले 3 माओवाद्यांना अटक

Last Updated:
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी तीन माओवाद्यांना अटक केली. जंगलात अभियान राबवणाऱ्या पोलिसांवरील हल्ल्याच्या गंभीर गुन्ह्यात या माओवाद्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप आहे.
advertisement
1/5
निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत मोठी कारवाई! लाखोंचं बक्षिस असलेले 3 माओवाद्यांना अटक
गडचिरोली पोलिसांनी अभियान राबवणाऱ्या पोलिसांची रेकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिला माओवाद्यांसह तीन माओवाद्यांना अटक केली आहे.
advertisement
2/5
लोकसभा निवडणुका असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दल अभियान राबवत असताना जंगलात फिरणाऱ्या जवानांची रेकी करण्याच्या दृष्टीने दोन महिला माओवाद्यासह तीन माओवादी फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
advertisement
3/5
यात काजल उर्फ सिंधू गावडे आणि गीता उर्फ सुकली या दोन महिला माओवाद्यांचा समावेश आहे. या दोघींचा जंगलात पोलीस दलावर हल्ले करून गोळीबार करणे यासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे.
advertisement
4/5
2020 मध्ये कोपर्शीच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक अधिकारी आणि एक जवान दोन पोलीस शहीद झाले होते. या घटनेतही या दोघींचा सहभाग होता.
advertisement
5/5
यासह एक जनमीलिशिया माओवादी पिसा नरोटेला ही अटक करण्यात आली आहे. या तिघांवर लाखो रुपयाचे बक्षीस आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोलीत मोठी कारवाई! लाखोंचं बक्षिस असलेले 3 माओवाद्यांना अटक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल