TRENDING:

Ambezari village : अचानक 15 ते 20 हत्ती अख्ख्या गावावर चालून आले; जीव वाचला पण संसार गेला, पाहा PHOTOS

Last Updated:
Ambezari village : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात एका छोट्या पाड्यावर अचानक हत्तींच्या कळपाने हल्ला चढवल्याने मोठा गोंधळ माजला. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
1/9
अचानक 15 ते 20 हत्ती अख्ख्या गावावर चालून आले; जीव वाचला पण संसार गेला, PHOTOS
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुक्कामी असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने अचानक आंबेझरी गावावर हल्ला चढवला.
advertisement
2/9
येथील 14 घरांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. घरातील अन्न धान्य जिवनाआवश्यक वस्तूंसह साहित्याचीही मोडतोड केल्याने एन पावसाळ्यात या कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे.
advertisement
3/9
आंधळी(सोनपूर) गट ग्रामपंचायत अंतर्गत फक्त 36 कुटुंब असलेला आंबेझरी डोंगर व घनदाट जंगलाने वेढलेला हा 100 टक्के आदिवासी कुटुंब असलेला छोटासा गाव गावकरी निसर्गाचा सानिध्यात भात शेती व इतर गोष्टींवर आपला उदर निर्वाह करतात.
advertisement
4/9
आज अचानक 18 ते 20 च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तींचा कळपाने गावावर हल्ला चढवला आणि घरांची नासधूस करण्यास सुरुवात केली.
advertisement
5/9
अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या गावकऱ्यांनी मुलाबाळांसह घरातून पळ काढला.
advertisement
6/9
काही वेळानंतर स्वतःला सावरत व बळ एकवटत गावकऱ्यांनी काठ्या हातात घेऊन ठेंभे पेटवत हत्तीच्या कळपाला गावातून पिटाळून लावण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यांचा धूमाकूळ सुरूच होता.
advertisement
7/9
सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रानटी हत्तींनी घराची व घरातील साहीत्याची मोठी मोडतोड तसेच घरातील अन्न धान्याची मोठी नासाडी केली.
advertisement
8/9
या घटनेत येथील गरीब कुटुंब निराधार झाले आहे. दुर्गम भागातील आदिवासी गरीब कुटुंब पावसाळ्यात 4 ते 6 महिन्यांचा अन्न धान्याचा साठा करून ठेवतात. मात्र, या हल्ल्यात त्यांचा हा साठाच नष्ट झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला असून मोठं संकट निर्माण झाले आहे.
advertisement
9/9
या शिवाय गावातील केळीचे झाडे तसेच गावालगत असलेल्या धान पीके ही पायदळी तूडवत मोठे नूकसान केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
Ambezari village : अचानक 15 ते 20 हत्ती अख्ख्या गावावर चालून आले; जीव वाचला पण संसार गेला, पाहा PHOTOS
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल