Gadchiroli Crime : अनैतिक संबंधात पतीचा अडसर, पत्नीने आखला प्रियकरासोबत कट, नात्याचा भयानक शेवट
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यात अनैतिक संबंधातून किराणा दुकानदाराची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
1/5

गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यात दवंडी येथील किराणा दुकानदाराची चार दिवसापूर्वी हत्या झाली होती. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने काटा काढल्याचं उघड झाले असून पोलिसांनी पत्नी सरितासह तीन जणांना अटक केली आहे.
advertisement
2/5
दवंडी येथील किराणा दुकान चालवणारे लखन सोनार 11 ऑक्टोबरला आपल्या घरात झोपले होते. मध्यरात्री पाच जणांनी तोंडाला काळा कपडा बांधून घरात प्रवेश केला आणि धारदार शस्त्रांनी वार करून लखनची हत्या केली आणि आरोपी पळून गेले.
advertisement
3/5
आपल्या समोरच आपल्या पतीची पाच जणांनी हत्या केल्याची तक्रार पत्नी सरिताने बेळगाव पोलिसात दाखल केली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला असता फिर्यादी असलेल्या पत्नी सरितानेच मुख्य आरोपी सुभाषच्या मदतीने पतीची घटत्या घडवण्याचा उघड झाल आहे.
advertisement
4/5
गेल्या दीड वर्षापासून पत्नी सरिता आणि आरोपी सुभाष यांच्यात अनैतिक संबंध होते. यातून पती पत्नीत वाद होत होता. या अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करण्याची सूचना पत्नी सरिताने केली होती. अखेर तिचा प्रियकर सुभाषने काही जणांना सोबत घेऊन तोंडाला काळा कपडा बांधून घरात प्रवेश केला आणि तिच्या पतीची तिच्या समोरच हत्या केली आणि निघून गेले.
advertisement
5/5
हा संपूर्ण कट पोलिसांनी उघड केल्यानंतर फिर्यादी पत्नी सरिता तिचा प्रियकर सुभाष याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli Crime : अनैतिक संबंधात पतीचा अडसर, पत्नीने आखला प्रियकरासोबत कट, नात्याचा भयानक शेवट