TRENDING:

Sleep Quality: रात्री झोप लागत नाही? हे घरगुती उपाय करतील कमाल, रात्रभर ताणून द्याल!

Last Updated:
Sleep Quality: सध्याच्या काळात जीवनशैलीतील सततच्या बदलांमुळे आणि वाढत्या मानसिक तणावामुळे अनेकांना झोप न येण्याची म्हणजेच निद्रानाशाची समस्या जाणवत आहे. रात्री नीट झोप न लागणे, वारंवार जाग येणे किंवा फार लवकर डोळे उघडणे या समस्या वाढत चालल्या आहेत. काही सोपे घरगुती उपायांचा अवलंब करून झोपेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारता येऊ शकते.
advertisement
1/7
रात्री झोप लागत नाही? हे घरगुती उपाय करतील कमाल, रात्रभर ताणून द्याल!
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पुरेशी झोप ही प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेची असते. एखादी व्यक्ती दीर्घकाळ झोप न येण्याच्या समस्येशी झगडत असेल तर तिच्या एकूण मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.
advertisement
2/7
झोपण्यापूर्वी गरम दूध पिणे हा पारंपरिक आणि प्रभावी उपाय मानला जातो. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते. यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिनचं प्रमाण वाढून झोप लागण्यासाठी मदत करते. याशिवाय, दुधात थोडी हळद किंवा मध घालून पिल्यास स्नायू सैल होतात आणि मन शांत होते.
advertisement
3/7
शांत झोप लागण्यासाठी तणाव कमी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. झोपण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा श्वसनाचे व्यायाम केल्यास मेंदू शांत होतो. यामुळे मनातील विचारांची गर्दी कमी होते आणि नैसर्गिकपणे झोप येते.
advertisement
4/7
झोपण्यापूर्वी मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपपासून किमान अर्धा तास दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण, स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेंदूला सतर्क ठेवतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर टाळावा. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचल्यास किंवा शांत संगीत ऐकल्यास लवकर झोप येते.
advertisement
5/7
झोपेसाठी घरातील वातावरणही महत्त्वाचा घटक आहे. खोलीत मंद प्रकाश, स्वच्छ बेडशीट आणि योग्य तापमान ठेवल्यास झोपेची गुणवत्ता वाढते. आरामदायी झोपेसाठी सुगंधी तेलांचा वापरही केला जातो.
advertisement
6/7
काही लोक झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ करून शरीरातील ताण कमी करतात. कोमट पाण्याने आंघोळ केल्यास स्नायू शिथिल होतात. त्यामुळे पटकन झोप लागते. आंघोळ केल्यानंतरची झोप अतिशय शांत आणि गाढ असते.
advertisement
7/7
घरगुती उपाय नियमित केल्यास झोपेच्या समस्यांवर बराच परिणाम होतो. मात्र, झोपेची समस्या दीर्घकाळ टिकून राहिल्यास वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण, झोपेची कमतरता असल्यास हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांनाही आमंत्रण देऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sleep Quality: रात्री झोप लागत नाही? हे घरगुती उपाय करतील कमाल, रात्रभर ताणून द्याल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल