कडक उन्हाचा झाडांना कोणताही नाही होणार त्रास, फॉलो करा या टिप्स झाडे राहातील हिरवीगार
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
सध्या कडक उन्हामुळे या झाडांची देखील नीट काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उन्हात करुपून रोपे मरून जाऊ शकतात.
advertisement
1/7

उन्हाच्या झळा आजकाल इतक्या वाढल्यामुळे पाण्याविना कुठल्याही सजीवाला जास्त काळ उन्हात थांबता येत नाही. त्यात माणसासोबत पशुपक्ष्यांसह झाडांचाही समावेश आहे. आपल्या घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा परसात बरेच जण कुंड्यांमध्ये झाडे लावतात.
advertisement
2/7
पण सध्या कडक उन्हामुळे या झाडांची देखील नीट काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उन्हात करुपून रोपे मरून जाऊ शकतात. त्यामुळेच अशा झाडांची नेमकी कशी काळजी घेतली गेली पाहिजे, याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापुरातील</a> रोपवाटिका चालक रोहित शिंदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
झाडांना आपल्या घरातील लहान मुलांप्रमाणे वाढवावे लागते. घराच्या आसपास लावलेल्या प्रत्येक झाडाला कधी काय द्यायचे हे आपणच ठरवावे लागते. त्यामुळे या उन्हाळ्यात प्रत्येकांनी झाडाला रोजच्या रोज नीट पाणी देणे, त्यांना कडक उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी उपाययोजना करणे, अशा गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, असे रोहित शिंदे यांनी सांगितले आहे.
advertisement
4/7
घराच्या आसपास आपण लावलेली झाडे ही सहसा सावलीतच असतात. मात्र काही वेळा अंगणातील झाडांवर कडक ऊन पडत असल्यास किंवा टेरेसवर, बाल्कनीत लावलेल्या झाडांची उन्हाळ्याच्या दिवसात विशेष काळजी घ्यावी लागते.
advertisement
5/7
यावर उपाय म्हणजे टेरेस किंवा बाल्कनीमधील झाडांना सावली करण्यासाठी ग्रीन पॉलिहाऊस कापड वापरून झाडांना सावली करू आपण शकतो. तसेच अंगणातील झाडांसाठी देखील थोड्याफार प्रमाणात सावली आपण स्वतः तयार केली पाहिजे. मुख्यतः दुपारी 12 ते 3 या कडक उन्हात झाडे उन्हात राहणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
उन्हाळ्याच्या दिवसात जास्त पाण्याची आवश्यकता प्रत्येकालाच असते. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे झाडांना देखील या दिवसात जास्त पाणी लागते त्यामुळेच झाडांना रोज संध्याकाळी पाणी घालणे योग्य ठरते. दिवसात झाडांना दिलेल्या पाण्यापैकी बरेचसे उन्हामुळे झाडांना मिळतच नाही. संध्याकाळच्यावेळी दिलेले पाणी रात्रभर मातीत मुरून झाडांसाठी ओलावा टिकवून ठेवू शकते. त्यामुळेच रोज संध्याकाळी आणि मुबलक प्रमाणात झाडांना पाणी दिले गेले पाहिजे, असेही रोहित सांगतात.
advertisement
7/7
दरम्यान काही झाडांना कडक उन्हाचा जास्त फरक पडत नाही. पण काही झाडे ही कमी उन्हाच्या ठिकाणीच योग्य प्रकारे वाढू शकतात. त्यामुळे हे देखील ओळखता आले पाहिजे. जेणेकरून आपण प्रत्येक झाडाला नीट वाढवू शकू. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज मुबलक पाण्यासह पंधरा दिवसातून एकदा खत झाडांना देणे आवश्यक आहे असे देखील रोहित यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कडक उन्हाचा झाडांना कोणताही नाही होणार त्रास, फॉलो करा या टिप्स झाडे राहातील हिरवीगार