फक्त 59 रुपयांत फळविक्रेता झाला करोडपती, कोल्हापूरच्या शुभमनं कशी केली कमाल?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आयपीएल सुरू झाल्यावर ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेकजण पैसे मिळवत असतात. कोल्हापूरचा फळविक्रेता फक्त 49 रुपयांत करोडपती झाला आहे.
advertisement
1/5

आयपीएल हा क्रिकेटचा उत्सव सुरू झाल्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. क्रिकेटशी संबंधित विविध गेमिंग ॲप्लीकेशन्सवर बरेचजण गेम खेळून पैसे कमावण्याचा प्रयत्नही करत आहेत.
advertisement
2/5
<a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरचा</a> एक फळ विक्रेता या क्रिकेटमुळेच एका रात्रीत करोडपती बनला आहे. ड्रीम 11 या ॲपवर गेम खेळून शुभम कुंभार या 26 वर्षीय तरुणाने एक करोड रुपये जिंकले आहेत.
advertisement
3/5
शुभम हा आई मंगल आणि वडील धनाजी कुंभार यांच्यासह फळ विक्रीचा व्यवसाय करतो. कोल्हापुरातील बापट कॅम्प येथील मुख्य चौकात 1998 पासून त्यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे.
advertisement
4/5
गेल्या चार पाच वर्षांपासून शुभम हा गणेश मूर्ती बनवून विकण्याचा व्यवसाय देखील करत आहे. त्याच काळात त्याला ड्रीम 11 ॲप वर गेम खेळण्याची सवय लागली.
advertisement
5/5
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्याच मॅच वेळी शुभमने गेम खेळून एक करोड रुपये जिंकले आहेत. तर आता या मिळणाऱ्या पैशांमधून स्वतःचे आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा शुभमने ठरवले आहे. (साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/कोल्हापूर/
फक्त 59 रुपयांत फळविक्रेता झाला करोडपती, कोल्हापूरच्या शुभमनं कशी केली कमाल?