'ती' कोण? लातूर कार जळीत कांडातला गणेश एका मेसेजमुळे सापडला, मृत व्यक्तीची ओळखही पटली
- Published by:Sachin S
Last Updated:
एखाद्या क्राईम सिनेमाला लाजवेल अशी घटना लातूरमध्ये घडली आहे. फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केला. (शशिकांत पाटील, प्रतिनिधी)
advertisement
1/11

ातूरमध्ये घडली आहे. फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केला. कारमध्ये आपला जळून मृत्यू झाला असं १२ तास संपूर्ण जगाला भासवलं. पोलिसांनी काही काळ त्याच्यावर विश्वास ठेवला. पण, जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा मेसेज आणि एका तरुणीचं कनेक्शन समोर आलं. एका तरुणीमुळे गणेशचा डाव उलटला आणि पोलिसांच्या गळाला लागला.
advertisement
2/11
लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा इथं एका कारमध्ये ५० वर्षीय इसमाचा जळून मृत्यू झाला. गणेश चव्हाण असं या तरुणाचं नाव सांगितलं जात होतं. पण, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मृत व्यक्ती गणेश चव्हाण ही जिवंत असल्याचं समोर आलं आहे. गणेश चव्हाण यानेच आपल्यााच मृत्यूचा बनाव केला होता.
advertisement
3/11
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औसा पोलीस स्टेशनच्या हद्दील शनिवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास वानवडा भागात एक कारला आग लागली असल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडीला बोलावण्यात आलं. कारची आग आटोक्यात आणल्यानंतर आतमध्ये पाहणी केली असता कारमध्ये एक मृतदेह आढळला. फक्त सांगाडा उरला होता. घटनेचं गांभीर्य पाहता तपास सुरू केलाय
advertisement
4/11
कारचा नंबर जो होता, त्यावरून कार मालकापर्यंत पोहोचलो. कार मालक जो होता त्याने नातेवाईकांना कार वापरायला दिली होती. ज्या नातेवाईकाला कार वापरायला दिली होती, त्याचं नाव गणेश चव्हाण आहे असं समोर आलं.
advertisement
5/11
गणेश चव्हाण दुपारी घरातून बाहेर गेला पण परत आला नव्हता. त्याचा मोबाईल सुद्धा बंद होता. त्यामुळे अशी धारणा झाली की, कारमध्ये मृत व्यक्ती ही गणेश चव्हाण आहे. त्यामुळे औसा पोलीस स्टेशनमध्ये अक्सामत मृत्यूची नोंद केली. तपास सुरू केला.
advertisement
6/11
पण, पोलिसांना गणेश चव्हाणवर संशय आला. त्याची इतर माहिती गोळा केली असता त्याची एक मैत्रीण सापडली. तिच्याक़डे चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की, गणेश चव्हाणकडे तिसरा फोन होता. घटना घडून गेल्यानंतरही या नंबरवरून या तरुणीशी संवाद साधला जात होता. मेसेज, चॅट सुरू होते. त्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरला.
advertisement
7/11
त्यामुळे लातूर पोलिसांनी या फोननंबरचा पाठलाग सुरू केला. आधी कोल्हापूर, नंतर सिंधुदुर्ग आणि नंतर विजयदुर्गपर्यंत गेली. त्यानंतर उशिरा गणेश चव्हाण हा जिवंत सापडला. त्यामुळे कारमध्ये असलेला मृत व्यक्तीचा सांगाडा हा दुसऱ्याच व्यक्तीचा होता.
advertisement
8/11
गणेशवर फ्लॅटचं कर्ज होतं. ते कर्ज कमी करण्यासाठी गणेश चव्हाण याने १ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स होता, तो काढण्याचा प्लॅन केला. त्यामुळे त्याने कट रचला, आणि कारमध्ये आपला मृत्यू झाला असा बनाव रचला.
advertisement
9/11
यासाठी त्याने तुळजापूर टी पॉईंट औसा इथून एका व्यक्तीला लिफ्ट दिली होती. गोविंद यादव असं या व्यक्तीचं नाव होतं. गणेशने गोविंद यादवला लिफ्ट दिली, त्यानंतर घेऊन गेला. गोविंद यादव याला कारच्या समोरील सिटीवर बसवलं होतं. कारला आग लागली तरी तो तिथून पळून जाणार नाही, असं प्लॅन करून गोविंद यादव यांचा खून केला. नंतर कारला आग लावून दिली.
advertisement
10/11
एवढंच नाहीतर मृतदेह हा आपलाच आहे, हे वाटावं म्हणून गणेशनं आपल्या हातातलं कडं हे गोविंद यादव ज्या ठिकाणी बसला होता, त्या सीटवर ठेवलं होतं. जेणे करून पोलिसांनाही वाटेल की, हा मृतदेह गणेश चव्हाण याचाच आहे.
advertisement
11/11
त्याच्या कुटुंबीयांनाही वाटलं की गणेश चव्हाण याचा मृत्यू झाला आहे. पण, औसा पोलिसांच्या तपासात सत्य समोर आलं आहे. औसा पोलीस स्टेशनमध्ये गोविंद यादव याचा खून केला या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेशला अटक केली आहे. या बनावामध्ये गणेश चव्हाणला कुणी मदत केली का, याचा तपास केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
'ती' कोण? लातूर कार जळीत कांडातला गणेश एका मेसेजमुळे सापडला, मृत व्यक्तीची ओळखही पटली