TRENDING:

Maharashtra Weather Update : सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि ला नीनो इफेक्ट, महाराष्ट्रात हवामानाची काय स्थिती?

Last Updated:
Maharashtra Weather Update : पश्चिम बंगालच्या खाडीत दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे.
advertisement
1/7
सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि ला नीनो इफेक्ट, महाराष्ट्रात हवामानाची काय स्थिती?
मुंबई : महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी थंड वारे सुटत आहेत. तर दिवसा तापमानाचा पारा वाढला आहे. देशभरात या वेळी ला निनाचा नोव्हेंबर महिन्यावर प्रभाव दिसेल असा अंदाज आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातही उष्णता जाणवणार आहे.
advertisement
2/7
डॉ. प्रिती शर्मा, यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ, चेन्नई, कर्नाटकचा काही भाग इथे पावसाची नोंद करण्यात आली आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याचं त्यांनी सांगितलं. 7 ते 10 नोव्हेंबर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात दिवसा वातावरण कोरडं राहील, मात्र तापमानाचा पारा रात्री आणि पहाटे उतरण्याची शक्यता आहे. 19-17 डिग्री टेम्पेचरपर्यंत तापमान खाली उतरत आहे.
advertisement
4/7
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात थंडीची चाहूल लागली आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
advertisement
5/7
मुंबईतील हवेचा निर्देशांक बुधवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला असून शिवडी, वरळी तसेच वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता मंगळवारीही मध्यम श्रेणीत होती.
advertisement
6/7
पश्चिम बंगालच्या खाडीत दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे. तसंच ला निनाचा प्रभाव असल्याने नोव्हेंबरचा दुसरा आठवडा आला तरी अजून तपामानात विशेष घट झाली नाही.
advertisement
7/7
हा प्रभाव आणखी किती दिवस राहणार ते पाहावं लागणार आहे. बे ऑफ बंगालच्या खाडीत होत असलेलं सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि त्यामुळे हवामान होणारे बदल यावरही हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. सध्या त्याचा थेट महाराष्ट्राच्या हवामानावर कोणताही परिणाम होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maharashtra Weather Update : सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि ला नीनो इफेक्ट, महाराष्ट्रात हवामानाची काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल