Maharashtra Weather Update : Dana Cyclone मुळे महाराष्ट्रावर संकट? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Maharashtra Weather Update: काही राज्यांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे तर काही राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
1/7

मुंबई : दाना चक्रीवादळ भयंकर वेगानं पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर आज धडकण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. याचा थेट परिणाम इतर राज्यांवर होणार नसला तरी हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे तर काही राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
2/7
अगदी बिहार, झारखंडमध्येही याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलं आहे. तर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील सरकारने अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर 170 हून अधिक ट्रेन पुढचे दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
advertisement
3/7
पंधरा दिवसांपासून दररोज सायंकाळी कोसळणाऱ्या परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यातील 955 महसुली गावे बाधित झाली आहेत.
advertisement
4/7
परतीच्या पावसाचा विपरीत परिणाम या कांदा रोपांवर झाला असून कांदा रोपे पिवळी पडण्यास सुरवात झाली आहे. ढगाळ हवामान, वाढते तापमान आणि पडणारा पाऊस जर थांबला नाही तर कांदा रोपांचे मोठे नुकसान होऊ शकतं.
advertisement
5/7
हे चक्रीवादळ पुढच्या 24 तासात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर पाहायला मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
6/7
मागच्या 15 दिवसांपासून परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. आज आणि उद्या पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळेल. तर दुसरीकडे आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा फटका बसू शकतो
advertisement
7/7
समुद्रकिनारपट्टीलगत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची आज शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र आज पाऊस नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maharashtra Weather Update : Dana Cyclone मुळे महाराष्ट्रावर संकट? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट