TRENDING:

Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी गुड न्यूज, विज्ञान केंद्र स्थानकातून गाठा थेट बीच, असं आहे प्लॅन

Last Updated:
Mumbai Metro 3 : मुंबई मेट्रो-3 विज्ञान केंद्र स्थानकातून वरळी बीचसाठी 1518 मीटर लांबीचा भूमिगत पादचारी मार्ग बांधला जाणार आहे. 531 कोटी खर्च होणार असून प्रवाशांना सोयीस्कर, सुरक्षित आणि जलद प्रवेश मिळेल.
advertisement
1/6
मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी गुड न्यूज, विज्ञान केंद्र स्थानकातून गाठा थेट बीच
मुंबईत आरे ते कफ परेड या मार्गावरील मेट्रो-3 भुयारी मेट्रोच्या विज्ञान केंद्र स्थानकातून थेट वरळी समुद्रकिनाऱ्याला जोडणी मिळणार आहे. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ५३१ कोटी रुपये खर्चून भूमिगत पादचारी मार्ग तयार करणार आहे.
advertisement
2/6
सध्या विज्ञान केंद्र स्थानक ते वरळी बीच अंतर दीड ते दोन किमी असून प्रवाशांना पोहोचण्यासाठी सध्या 5 किमीचा फेरा मारावा लागतो. या नव्या मार्गामुळे प्रवाशांना मोठा वेळ आणि कष्ट वाचेल. भूमिगत पादचारी मार्गाची एकूण लांबी १५१८ मीटर असेल.
advertisement
3/6
मेट्रो-3 ही भारतातील सर्वात लांब भुयारी मेट्रो आहे. ही आरे जेव्हीएलआर ते कफ परेड अशी 33 किमी लांब असून 27 स्थानकांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांना वेगवान आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली आहे.
advertisement
4/6

5/6
पादचारी मार्ग सुरक्षित आणि आधुनिक सुविधा असलेला असेल शिवाय मुंबईकर आणि पर्यटक यांना या सुविधेमुळे समुद्रकिनाऱ्याला थेट पोहोचता येईल.
advertisement
6/6
हा प्रकल्प मुंबईच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे. प्रवाशांना सोयीस्कर सुविधा, वेळेची बचत आणि सुरक्षिततेची हमी या सर्व गोष्टी मिळणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी गुड न्यूज, विज्ञान केंद्र स्थानकातून गाठा थेट बीच, असं आहे प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल