TRENDING:

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नागपूरच्या शहाना फातिमाचे शिकागोत यश

Last Updated:
नागपूरच्या शहाना फातिमाने इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सायबर सुरक्षा क्षेत्रात प्रथम श्रेणीसह मास्टर डिग्री मिळवली आहे. तिचे PHD करून देशासाठी काम करण्याचे स्वप्न आहे.
advertisement
1/6
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नागपूरच्या शहाना फातिमाचे शिकागोत यश
प्रतिनिधी उदय तिमांडे, नागपूर: नागपूरच्या शहाना फातिमाने अमेरिकेतील सायबर सुरक्षा क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळविले आहे,  अमेरिकेतील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
advertisement
2/6
यामध्ये नागपूरच्या शहाना फातिमाची तिच्या सायबरसुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यापीठाने उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड केली आहे. शहाना फातिमाने इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिकागो, अमेरिका येथून सायबर फॉरेन्सिक्स आणि सिक्युरिटी विषयात मास्टर डिग्री प्रथम श्रेणी आणि विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे.
advertisement
3/6
विशेष म्हणजे सायबरसुरक्षा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पासून मिळाली आहे.. भविष्यात PHD करून देशासाठी सायबर सुरक्षेसाठी काम कारायच असल्याचं शहानाचे स्वप्न असल्याचं तिचे वडील शहाझाद अख्तर यांनी बोलताना सांगितलं.
advertisement
4/6
अमेरिकेतील शिकागो येथील इल्लिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT, शिकागो) या नामांकित संस्थेने आपल्या प्रत्येक महाविद्यालयातून केवळ सातच विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या निवडीत नागपूरच्या शाहाना फातिमाचा समावेश झाला असून, सायबरसुरक्षा क्षेत्रात तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ही निवड करण्यात आली आहे.
advertisement
5/6
शाहाना फातिमा सध्या इल्लिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिकागो येथून सायबर फॉरेन्सिक्स आणि सिक्युरिटी विषयात मास्टर्स करत आहे. तिने डिजिटल फॉरेन्सिक्स आणि पायाभूत सुरक्षा डिझाईन या क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली असून, २०२४ मध्येच तिला उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी पुरस्कारही मिळाला आहे.
advertisement
6/6
शाहानाची ही यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेसारख्या नव्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. तिच्या मार्गदर्शनासाठी डॉ. रिजवान अहमद यांचे मोलाचे योगदान असल्याचे शाहानाने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नागपूरच्या शहाना फातिमाचे शिकागोत यश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल