TRENDING:

Monsoon आधीच आस्मानी संकट, विदर्भात वादळी पावसाचं धुमशान, नागपूरसह 11 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Last Updated:
Vidarbha Weather: राज्यासह विदर्भात मान्सूनपूर्वीच वादळी पावसाने हजेरी लावलीये. पुढील 24 तासांसाठी सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
advertisement
1/5
Monsoon आधीच आस्मानी संकट, विदर्भात वादळी पावसाचं धुमशान, 11 जिल्ह्यांना इशारा
राज्यातील विविध भागांत मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला आहे. विदर्भातही मे महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आज 20 मे रोजी सुद्धा विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नागपूरसह सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
विदर्भातील तापमानात एप्रिल महिन्याच्या तुलनेत काहीशी घट बघायला मिळत आहे. सध्याचं विदर्भातील कमाल तापमान हे 38 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान 24 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. संपूर्ण विदर्भात आज 20 मे रोजी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
3/5
विदर्भातील 11 ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
गेल्या काही दिवसांत गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काढणीनंतर पिकांची विल्हेवाट लावण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे आता पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पुढील शेतीच्या कामासाठी तयारीत राहणे देखील महत्वाचे आहे.
advertisement
5/5
विदर्भात उकाडा आणि पाऊस दोन्ही कायम असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दमट वातावरण असल्यामुळे विविध आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने काही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Monsoon आधीच आस्मानी संकट, विदर्भात वादळी पावसाचं धुमशान, नागपूरसह 11 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल