TRENDING:

Rain Alert: विदर्भात आस्मानी संकट कायम, नागपूरसह या जिल्ह्यांना अलर्ट, 22 मेचा हवामान अंदाज

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भात मान्सूनपूर्वीच वादळी पावसाने जोरदार हजेरी लावलीये. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5
विदर्भात आस्मानी संकट कायम, नागपूरसह या जिल्ह्यांना अलर्ट, 22 मेचा हवामान अंदाज
विदर्भात मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. सततच्या वादळी वाऱ्यांमुळे व विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. आज 22 मे रोजी देखील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही भागांत वातावरण ढगाळ राहील पण पावसाची शक्यता कमी आहे.
advertisement
2/5
नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये तापमान 35 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/5
वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पावसाची शक्यता नसली तरी उष्णता आणि दमट हवामान जाणवू शकतं.
advertisement
4/5
अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. आकाशात विजा चमकत असतील तर उघड्यावर थांबू नये. झाडांखाली आणि वीजेच्या खांबाजवळ थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
5/5
एकूणच, विदर्भात मान्सूनपूर्व पावसाचा परिणाम अजूनही कायम असून हवामानात अस्थिरता जाणवत आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेऊन सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Rain Alert: विदर्भात आस्मानी संकट कायम, नागपूरसह या जिल्ह्यांना अलर्ट, 22 मेचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल