TRENDING:

Nagpur Weather: विदर्भात पुन्हा आस्मानी संकट, नागपूरसह या जिल्ह्यांना अलर्ट, पाहा आजचं हवामान

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. आज वादळी पावसासह काही ठिकाणी विजांचा धोका आहे.
advertisement
1/5
विदर्भात पुन्हा आस्मानी संकट, नागपूरसह या जिल्ह्यांना अलर्ट, पाहा आजचं हवामान
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचे सावट दिसून येत आहे. आज 12 मे रोजी देखील संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूरसह इतर काही जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
2/5
नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे झाडे कोसळण्याची आणि विजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारनंतर आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यांचे प्रमाण अधिक राहू शकते.
advertisement
3/5
विदर्भातील कमाल तापमान 36 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज असून, वातावरणात दमटपणा जाणवू शकतो. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी काढलेले पीक किंवा शेतातील साठवलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
advertisement
4/5
विजेच्या कडकडाटादरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. आकाशात विजा चमकत असताना मोबाइल वापरणे, उघड्यावर फिरणे, मोटारसायकलवर प्रवास करणे टाळणे गरजेचं आहे. शेती कामे करताना हवामानाचा अंदाज पाहूनच पुढील पाऊले उचलावीत. घरांची छतं, शेतगाळ्यांची झाकणं, जनावरांची गोठ्यांची व्यवस्था योग्यरीत्या करून घ्यावी.
advertisement
5/5
स्थानिक प्रशासनाच्या सूचना ऐकून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. त्याचबरोबर पुढील काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Weather: विदर्भात पुन्हा आस्मानी संकट, नागपूरसह या जिल्ह्यांना अलर्ट, पाहा आजचं हवामान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल