आजचं हवामान: विदर्भावर गारपिटीचं संकट, 24 तास धोक्याचे, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज उष्णतेचा पारा चाळीशीपार असतानाच गारपिटीचं संकट कोसळणार आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांत राज्यात हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. काही भागांत उष्ण आणि दमट वातावरण तर काही भागांत अवकाळी पावसाचं सावट आहे. विदर्भात तर पाऊस आणि तापमान तापमान असे दुहेरी संकट असल्याचे दिसून येत आहे.
advertisement
2/7
अकोल्यात उष्णतेचा पारा 44 अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज 17 एप्रिलला नागपूरमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी अंशतः ढगाळ आकाश असू शकतं.
advertisement
3/7
अमरावतीमधील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं.
advertisement
4/7
विदर्भातील अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज 17 एप्रिलला तेथील कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी सुद्धा अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं.
advertisement
5/7
वर्धा येथील कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं. गोंदियामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
6/7
बुलढाणातील कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. त्याठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असू शकतं. चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस इतके राहील
advertisement
7/7
विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं देखील हवामान विभागानं सांगितलंय. विदर्भात कडक उन्ह आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
आजचं हवामान: विदर्भावर गारपिटीचं संकट, 24 तास धोक्याचे, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?