Vidarbha Weather: बापरे! सूर्याची भट्टी पेटली, जगात सर्वात उष्ण शहरे विदर्भात, आज पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातील तापमानात एप्रिल महिन्यात मोठी वाढ झाली आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरं विदर्भात असून आज पुन्हा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

राज्यातील उष्णतेचा पारा चांगलाच चढला असून विदर्भात सूर्याची भट्टी पेटल्याचे चित्र आहे. एप्रिल महिला सर्वाधिक हॉट ठरत असून जगातली सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत 4 शहरे विदर्भातील आहेत. 45.6 अंश सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर हे जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय.
advertisement
2/5
चंद्रपूरनंतर विदर्भातील ब्रह्मपुरी शहर हे सर्वाधिक उष्ण असून इथं तापमान 45 अंशांवर गेलाय. जगभरातील तिसरं उष्ण शहर ब्रह्मपुरी असून अमरावती पाचव्या क्रमांकावर आहे. तर 44.1 अंशांसह अकोला 12 व्या क्रमांकावर आहे. आता पुढील 5 दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
3/5
विदर्भात आज 22 एप्रिल रोजी पुन्हा तापमानाचा पारा चढणार आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 41 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तर नागपूर, चंद्रपूर, अमरावती व अकोला जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/5
हवामान खात्याच्या माहितीनुसार, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मुख्यतः निरभ्र आकाश असून, चंद्रपूरमध्ये दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र या ढगाळ वातारणामुळे मुळे उष्णतेपासून फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
advertisement
5/5
वर्धा, गोंदिया आणि बुलढाणा या जिल्ह्यांतही तापमान 41 ते 44 अंशांच्या दरम्यान राहील. तर यवतमाळ, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांतील तापमान देखील 41 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. वाढते तापमान आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Vidarbha Weather: बापरे! सूर्याची भट्टी पेटली, जगात सर्वात उष्ण शहरे विदर्भात, आज पुन्हा अलर्ट