TRENDING:

विदर्भाला आज पुन्हा यलो अलर्ट; पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार 

Last Updated:
पुढील दोन दिवस राज्यात परतीच्या पावसाचा जोर असणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
advertisement
1/5
विदर्भाला आज पुन्हा यलो अलर्ट; पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार 
राज्यात परतीचा पाऊस आणि ऑक्टोबर हिट या दोन्हीमुळे अनेक भागांत नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
2/5
विदर्भात रविवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. तर काही ठिकाणी वातावरण अंशतः ढगाळ आणि हलका सूर्यप्रकाश असल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला आहे.
advertisement
3/5
आज 21 ऑक्टोबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूरमध्ये सायंकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/5
पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कधी कपाशी उत्पादक शेतकऱ्याला चिंता तर कधी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला चिंता, हे चक्र गेल्या 1 महिन्यापासून सुरू आहे. सोयाबीन ओली असल्याने त्याला योग्य तो भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत.
advertisement
5/5
गेले काही दिवस विदर्भातील काही भागांत जोरदार पाऊस झालाय. तर काही ठिकाणी ऑक्टोबर हिट बघायला मिळाली आहे. अमरावती, नागपूर, अकोला या जिल्ह्यांत गेल्या 3 दिवसांत बऱ्यापैकी पाऊस झालाय. इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
विदर्भाला आज पुन्हा यलो अलर्ट; पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल