व्हेंटिलेटेड सीटसह येणारी कार घ्यायचीये? 'हे' आहेत 10 स्वस्त ऑप्शन! किंमत 8.37 लाखांपासून सुरू
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. या काळात गाड्यांच्या सीटवर बसल्यावर अनेकदा घाम येतो. पण कारला व्हेंटिलेटेड सीट असेल तर ही समस्या दूर होते. आज आपण व्हेंटिलेटेड सीट असणाऱ्या 10 स्वस्त गाड्यांची लिस्ट पाहणार आहोत.
advertisement
1/10

Renault Kiger: सध्याच्या काळात कायगर ही व्हेंटिलेटेड सीट्ससह येणारी देशातील सर्वात परवडणारी कार आहे. या कारच्या Emotion व्हेरिएंटमध्ये प्रीमियम फीचर सादर करण्यात आलंय. स्टायलिश लूक आणि टर्बो इंजिनसह येणारी ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही बजेट ग्राहकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. याची एक्स-शोरुम किंमत जवळपास 8.37 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
2/10
Kia Sonet: सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये किआ सोनेट आपल्या फीचर्ससाठी ओळखली जाते. सोनेटच्या HTX आणि त्याहून वरच्या व्हेरिएंट्समध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्सची सुविधा मिळते. प्रीमियम इंटीरियर आणि हाय-टेक फीचर्ससह येणारी ही कार तरुणांमध्ये खुप प्रसिद्ध आहे. या कारची किंमत जवळपास 10.80 लाख रुपये (एक्स-शोरूम)पासून सुरू होते.
advertisement
3/10
Tata Punch EV: इलेक्ट्रिक कारची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी टाटा पंच ईव्ही सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. या कारच्या Empowered+ S व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स दिले आहेत. ही भाररातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारमधून एक आहे. ज्यामध्ये आरामदायर फीचर्स उपलब्ध आहेत. या कारची एक्स-शोरुम किंमत जवळपास 12.29 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
4/10
Skoda Kylaq: स्कोडाची नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायलाकही या लिस्टमध्ये येते. यूरोपीय डिझाइन आणि मजबूत बिल्ड क्वालिटीसह येणाऱ्या या कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेशन फीचर देण्यात आले आहे. ज्या लोकांना सेफ्टीसह कंफर्ट हवं आहे त्यांच्यासाठी या कार बेस्ट आहेत. या कारची किंमत 11.50 लाख रुपयांच्या आसपास आहे.
advertisement
5/10
Hyundai Venue: ही कार आपल्या सेगमेंटची सर्वात फीचर-लोडेड कारमधून एक आहे. वेन्यूच्या SX(O) व्हेरिएंटमध्ये फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स मिळतात. हे फीचर मोठ्या प्रवासादरम्यान घामापासून सुटका देते. हुंदईची विश्वासार्ह सर्व्हिस आणि रिफाइंड इंजिन याला एक मजबूत दावेदार बनवते. या कारची एक्स-शोरुम किंमत 12.44 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
6/10
Maruti Suzuki XL6: तुम्हीही एक फॅमिली MPV शोधत असाल. तर मारुती XL6 सर्वात स्वस्त ऑप्शन आहे. याच्या Alpha+ व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स देण्यात आले आहेत. 6-सीटर कॉन्फिगरेशन आणि चांगल्या मायलेजसह ही कार फॅमिली ट्रिप्ससाठीही आरामदायक ठरते. या कारची एक्स-शोरुम किंमत जवळपास 12.97 लाख रुपये आहे.
advertisement
7/10
Citroën Basalt: सिट्रोएनची नवी कूपे SUV बेसाल्ट आपल्या यूनिक डिझाइन आणि कंफर्टसाठी ओळखली जाते. याच्या टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड सीट्सचा ऑप्शन मिळतो. ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त लेगरूम आणि बेस्ट राइड क्वालिटीचं वचन देते. या कारची किंमत जवळपास 12.50 लाख रुपये (एक्स-शोरूम)पासून सुरू होते.
advertisement
8/10
Tata Nexon: भारतातील सर्वात सुरक्षित कारच्या लिस्टमध्ये असणाऱ्या टाटा नेक्सॉनच्या Fearless+ व्हेरिएंटमध्ये व्हेंटिलेटेड सीट्सची सुविधा देण्यात आली आहे. नेक्सॉन आपल्या बोल्ड लूक आणि अनेक इंजिन ऑप्शन (पेट्रोल, डिझेल, सीएनजी) मुळे ग्राहकांची पहिली पसंत ठरली आहे. व्हेंटिलेटेड सीट्सच्या व्हेरिएंट्सची किंमत जवळपास 12.20 लाख रुपयांपासून सुरू होते.
advertisement
9/10
Kia Syros: किआची नवी SUV सायरोसही व्हेंटिलेटेड सीट्ससह येते. विशेष म्हणजे ही या सेगमेंटच्या काही मोजक्या कारपैकी एक आहे जी मागील व्हेंटिलेटेड सीट्स देते. मॉडर्न फीचर्स आणि बोल्ड डिझाइनसह ही कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालतेय. याची सुरुवातीची किंमत जवळपास 11.0 लाख रुपये आहे.
advertisement
10/10
MG Astor: ही कार आपल्या प्रीमियम फिट आणि फिनिशसाठी ओळखली जाते. या कारच्या निवडक व्हेरिएंट्समध्ये व्हेंटिलेटेड सीट्स आणि AI असिस्टेंट सारखे फीचर्स मिळतात. ही एक टेक-सेव्ही कार आहे. जी चालवण्यात खूप स्मूथ आहे आणि लग्जरी अनुभव देते. या फीचरसह येणाऱ्या मॉडलची किंमत जवळपास 13 लाख रुपयांपासून सुरू होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
व्हेंटिलेटेड सीटसह येणारी कार घ्यायचीये? 'हे' आहेत 10 स्वस्त ऑप्शन! किंमत 8.37 लाखांपासून सुरू