'Help! श्वास गुदमरतोय', दिपिका पादुकोणने सोशल मीडियावर मागितली मदत, काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या सोशल मीडिया पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने थेट सोशल मीडियावर मदत मागितली आहे. असं नेमकं घडलं तरी काय?
advertisement
1/7

'Help! श्वास गुदमरतोय' अभिनेत्री दिपिका पादुकोणची सोशल मीडियावरील ही पोस्ट. या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. दिपिका पादुकोणने मदत मागितली आहे.
advertisement
2/7
दिपिका पादुकोण काही दिवसांपूर्वी अभिनय क्षेत्रातील कामांच्या तासांमुळे चर्चेत आली होती. आता तिने आणखी एका नवीन मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
3/7
दिपिका पादुकोणने उपस्थित केलेला हा मुद्दा फक्त तिच्यापुरता मर्यादित नाही किंवा सिनेसृष्टीशी संबंधितही नाही. तर तो तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे.
advertisement
4/7
दिपिकाने ज्या गोष्टीकडे सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे, तो मुद्दा आहे प्रदूषणाचा. मुंबईतील वाढतं वायू प्रदूषण.
advertisement
5/7
दिपिकाने मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा फोटो शेअर करत मुंबई महापालिकेकडे मदत मागितली आहे. हे शहर विशेषत: इथली मुलं गुदमरत असल्याचं तिने सांगितलं. हे ठिक कसं काय आहे? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
advertisement
6/7
दिपिकाच्या कामाबाबत म्हणायचं तर 2024 साली रिलीज झालेल्या सिंघम अगेन फिल्ममध्ये ती शेवटची दिसली होती. ज्यात तिने पोलिसाची भूमिका केली होती.
advertisement
7/7
आता दिपिका शाहरुख खानसोबत 'किंग' आणि AA22xA6 या तेलुगू अ‍ॅक्शन फिल्ममध्ये अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'Help! श्वास गुदमरतोय', दिपिका पादुकोणने सोशल मीडियावर मागितली मदत, काय घडलं?