TRENDING:

मेटाचं 13 वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी गिफ्ट! ओपन करू शकतील WhatsApp Account

Last Updated:

WhatsApp Account for Minor : मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने 13 वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठीही अकाउंट ओपन करण्याची परवानगी दिली आहे. यात काय सुविधा असतील चला सविस्तर जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने 13 वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी पॅरेंटिंग कंट्रोल अकाउंट सुरु करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत पालकांच्या देखरेखीखाली लहान मुलं या माध्यमाचा उपयोग करु शकतील. हे पाऊल व्हॉट्सअ‍ॅपच्या धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल मानला जातोय. कारण आतापर्यंत या मंचाचा उपयोग किमान वय 13 वर्षे (काही क्षेत्रांमध्ये) ठेवण्यात आला होता.
व्हॉट्सअॅप अकाउंट
व्हॉट्सअॅप अकाउंट
advertisement

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या 'ब्लॉग' मध्ये म्हटलेय की, कुटुंब आणि एक्सपर्ट्सकडून मिळालेल्या सल्ल्याच्या आधारावर पालक नियंत्रित अकाउंटची नवी व्यवस्था सुरू केली जात आहे. या अंतर्गत आई-वडील किंवा पालक लहान मुलांसाठी व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार करु शकतील आणि त्याच्या उपयोग फक्त मेसेज पाठवणे किंवा कॉल करण्यापर्यंत मर्यादित ठेवतील. कंपनीनुसार, पालक मुलांची कॉन्टॅक्ट लिस्ट कंट्रोल करु शकतील. खरंतर मेसेजा कंटेंट 'एंड टू एंड एन्क्रिप्शन'ने सुरक्षित राहील.

advertisement

लॅपटॉपच्या किंमतीत होणार मोठी वाढ? 30 हजारांचा होऊ शकतो 45 हजारांना, पण का?

पालकांच्या हातात असेल कंट्रोल 

नवीन नियंत्रण व्यवस्था आणि इतर सेटिंग्ज पालकांच्या पिनच्या माध्यमातून सुरक्षित केल्या जातील आणि फक्त पालकच प्रायव्हसी संबंधित सेटिंग्ज पाहू किंवा बदलू शकतील. म्हणजेच, मुलाच्या नावाने व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडले जात असले तरी, पालकांचा त्यावर पूर्ण कंट्रोल असेल. पालक अकाउंटवरील कोणत्याही सेटिंग्ज करू शकतील, मुलांना फक्त ते वापरण्याची परवानगी असेल. कंपनीने सांगितले की, हे फीचर सध्या टप्प्याटप्प्याने आणले जात आहे.

advertisement

या अकाउंटमध्ये अनेक फीचर्स नसतील 

मेटाने सांगितलेय की, पॅरेंट-मॅनेज्ड अकाउंट्समध्ये अनेक खास फीचर्स देलेली नाहीत. या अकाउंट्समध्ये स्टेटस अपडेट्स, चॅनल्स किंवा मेटा एआय फीचर्सचा सपोर्ट नाही. या व्यतिरिक्त वन-टू-वन चॅट्समध्ये गायब होणारे मेसेजही डिसेबल केले गेले आहेत.

अनोळखी कॉन्टॅक्ट्सचे मेसेज एका वेगळ्याच मेसेज रिक्वेस्ट फोल्डरमध्ये जातील. जे फक्त पेरेंट पिनने अ‍ॅक्सेप्ट केले जाऊ शकेल. ज्यावेळी मुलं एखादा नवा कॉन्टॅक्ट अ‍ॅड, ब्लॉक किंवा रिपोर्ट करेल. तर पालकांना याची माहिती मिळते. ज्यामुळे ते आपल्या मुलांच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवू शकतील.

advertisement

YouTubeवर 1 Million व्ह्यूज आल्यावर छप्परफाड कमाई होते? पाहा कसं आहे गणित

पालक आणि मुलांचे अकाउंट कसे तयार करावे 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या निर्बंधनंतर मेटा म्हणते की, या अकाउंट्समध्येही एंड-टू-एंड इन्क्रिप्शन प्रोटेक्शन मिळेल. जे प्लॅटफॉर्मवर इतर जागी मिळते. जेणेकरुन बोलणे पूर्णपणे प्रायव्हेट राहू शकेल. WhatsApp म्हणते की, ज्या आई-वडिलांना आपल्या मुलांना मेसेजिंग अ‍ॅपशी इंट्रोड्यूस करायचे आहे. ते रजिस्ट्रेशन प्रोसेस दरम्यान पॅरेंट-मॅनेज्ड अकाउंट तयार करु शकतात. साइन-अपच्या वेळी त्यांना प्री-टीनची जन्मतारीख नोंदवून पॅरेंट-मॅनेज्ड अकाउंट सेटअप करण्याचा ऑप्शन मिळेल. सेटअप प्रोसेसमध्ये आई-वडील आणि मुलं दोघांनाही फोनची गरज असेल. जेणेकरुन अकाउंट आपसात लिंक केले जावेत.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
मेटाचं 13 वर्षांहून कमी वयाच्या मुलांसाठी गिफ्ट! ओपन करू शकतील WhatsApp Account
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल