Gold Silver gold price jalgaon: डॉलर मजबूत होताच चांदी गडगडली! जळगावात एक झटक्यात 10 हजार रुपयांनी घसरले दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले होते, त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता एकाच झटक्यात १० हजार रुपयांची झालेली ही घसरण पाहता, जळगावच्या सराफ बाजारात पुन्हा एकदा लगबग वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
1/6

जळगाव, नितीन नांदुरकर: सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या बाजारपेठेत आज मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे त्याचा फटका सोन्या चांदीला बसला. ज्यांनी ऑनलाइन गुंतवणूक केली त्यांना तोटा झाला तर दागिने खरेदी करणाऱ्यांना फायदा झाला.
advertisement
2/6
विशेषतः चांदीच्या दराने मोठी गटांगळी खाल्ली असून, एका दिवसात प्रति किलो १० हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरातही मोठी घट झाल्याने लग्नसराईच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
3/6
आज बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळाली. चांदीचा दर जो काही दिवसांपूर्वी २,३०,००० रुपये प्रति किलोवर होता, तो आता थेट २,२०,००० रुपयांवर खाली आला आहे. म्हणजेच चांदी खरेदी करणाऱ्यांचे एका किलोमागे तब्बल १० हजार रुपये वाचणार आहेत.
advertisement
4/6
सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर, सोन्यातही प्रति तोळा ५ हजार रुपयांची घट झाली आहे. सोन्याचा भाव १,४४,००० रुपयांवरून १,३९,००० रुपयांपर्यंत खाली आला आहे. हवामान आणि जागतिक युद्धाच्या सावटासोबतच आता 'डॉलर'ने आपला खेळ दाखवला आहे.
advertisement
5/6
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा निर्देशांक मजबूत झाल्यामुळे सोन्या-चांदीची मागणी काहीशी मंदावली आहे. जेव्हा जेव्हा डॉलर वधारतो, तेव्हा सोन्याच्या किमतीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो, असा अर्थशास्त्राचा नियम यावेळी जळगावच्या बाजारपेठेत अनुभवायला मिळत आहे.
advertisement
6/6
गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले होते, त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता एकाच झटक्यात १० हजार रुपयांची झालेली ही घसरण पाहता, जळगावच्या सराफ बाजारात पुन्हा एकदा लगबग वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांच्या घरी लग्नसराई आहे, त्यांच्यासाठी ही खरेदीची उत्तम संधी मानली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
Gold Silver gold price jalgaon: डॉलर मजबूत होताच चांदी गडगडली! जळगावात एक झटक्यात 10 हजार रुपयांनी घसरले दर