Nashik Accident: सप्तश्रृंगीच्या घाटात भीषण अपघात, Bolero 800 फूट दरीत कोसळली, सहा जणांचा जागेवर मृत्यू
- Published by:Prachi Amale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
Nashik Accident : गाडी दरीत सुमारे 700 ते 800 फूट खोल असल्याने बचाव पथकांना अनेक अडचणी येत आहेत.
advertisement
1/7

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सप्तशृंगी गडाच्या घाटातून एक बोलेरो गाडी तब्बल 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली आहे.
advertisement
2/7
या दुर्घटनेत चार ते पाच जणांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
3/7
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची पथकं आणि स्थानिक पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरी अतिशय खोल असल्याने बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. गाडी दरीत सुमारे 700 ते 800 फूट खोल असल्याने बचाव पथकांना अनेक अडचणी येत आहेत.
advertisement
4/7
प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो वाहनातील सर्व प्रवासी सप्तशृंगी देवीचे दर्शन करून परतीच्या मार्गाने खाली उतरत होते, त्या दरम्यान हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
5/7
अपघात झाला तो भाग डोंगराळ आणि वळणदार रस्त्यांनी भरलेले असल्याने या भागात यापूर्वी देखील अनेक अपघात या भागात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
advertisement
6/7
घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून,अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासानंतरच याबाबत अधिकृत माहिती देण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
advertisement
7/7
या अपघातानंतर परिससरात मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Accident: सप्तश्रृंगीच्या घाटात भीषण अपघात, Bolero 800 फूट दरीत कोसळली, सहा जणांचा जागेवर मृत्यू