TRENDING:

मृणाल की धनुष... शिक्षणात कोण कोणावर भारी? एकाला तर डिग्री मिळण्याआधीच कॉलेजने काढलं होतं बाहेर!

Last Updated:
Mrunal Thakur-Dhanush Wedding Rumours: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूडची 'सीता रामम' फेम मृणाल ठाकूर यांच्या लग्नाच्या अफवांनी सध्या इंटरनेटवर जणू आग लावली आहे.
advertisement
1/10
मृणाल की धनुष... शिक्षणात कोण कोणावर भारी?
सध्या सोशल मीडिया उघडलं की एकच जोडी डोळ्यांसमोर येतेय, दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूडची 'सीता रामम' फेम मृणाल ठाकूर. या दोघांच्या लग्नाच्या अफवांनी सध्या इंटरनेटवर जणू आग लावली आहे.
advertisement
2/10
त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्याबद्दलच्या काही जुन्या गोष्टीही आता खणून काढल्या जात आहेत. पडद्यावर अत्यंत गंभीर आणि समजूतदार भूमिका साकारणारे हे दोन स्टार्स खऱ्या आयुष्यात नक्की किती शिकले आहेत? आणि यातल्या एकाला चक्क कॉलेजमधून बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला होता? चला, जाणून घेऊया या दोघांच्या शिक्षणाची रंजक कहाणी.
advertisement
3/10
मृणाल ठाकूरचा शैक्षणिक प्रवास जळगावच्या 'सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूल'मधून सुरू झाला. त्यानंतर पत्रकारीतेचं स्वप्न उराशी बाळगून तिने मुंबईच्या नामांकित केसी (KC) कॉलेजमध्ये 'बॅचलर ऑफ मास मीडिया' (BMM) साठी प्रवेश घेतला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
advertisement
4/10
कॉलेजमध्ये असतानाच मृणालला 'मुझसे कुछ कहती... ये खामोशियां' या मालिकेची ऑफर मिळाली. शूटिंगच्या व्यापापायी मृणालची हजेरी कमी पडली. कॉलेज प्रशासनाने कडक भूमिका घेतली आणि तिला परीक्षेला बसू दिलं नाही. परिणामी, डिग्री पूर्ण होण्याआधीच मृणालला कॉलेज सोडावं लागलं.
advertisement
5/10
दरम्यान, गुगलवर अनेक ठिकाणी ती 'बी.टेक' झाल्याचं सांगितलं जातं, पण मृणालने स्वतः स्पष्ट केलं आहे की ही माहिती साफ चुकीची आहे. कॉलेजमधून काढलं गेल्यावर डबल डिग्रीचा प्रश्नच येतो कुठे, असं तिने हसत विचारलं होतं.
advertisement
6/10
दुसरीकडे, नॅशनल अवॉर्ड विजेता धनुष याची गोष्ट थोडी हटके आहे. धनुषला खरं तर अभिनय क्षेत्रात यायची अजिबात इच्छा नव्हती. त्याला मरीन इंजिनिअरिंग करायचं होतं. पण त्याचे वडील आणि भावाच्या (दिग्दर्शक सेल्वा राघवन) आग्रहाखातर त्याला कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागलं.
advertisement
7/10
१२ वी नंतर त्याने मदुराई कामराज युनिव्हर्सिटीमध्ये बी.सी.ए (BCA) साठी प्रवेश घेतला. पण वयाच्या अवघ्या १६-१७ व्या वर्षापासून तो चित्रपटांत इतका बिझी झाला की त्याला नियमित कॉलेज करणं जमलं नाही. अखेर त्याने 'डिस्टन्स लर्निंग'च्या माध्यमातून आपली पदवी पूर्ण केली.
advertisement
8/10
जर आपण कागदोपत्री पदवीचा विचार केला, तर धनुष हा मृणालपेक्षा शिक्षणात थोडा पुढे आहे, कारण त्याने आपली ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केली आहे. मृणालच्या बाबतीत अनुभवाचं शिक्षण मोठं आहे.
advertisement
9/10
अभिनयासोबतच दिग्दर्शन, गायन आणि लेखन अशा अष्टपैलू कलेत धनुषचा हात कोणीही धरू शकत नाही, तर मृणालची मास मीडियाची समज तिच्या पीआर स्किल्समध्ये स्पष्टपणे दिसून येते.
advertisement
10/10
धनुष आणि मृणालने अद्याप त्यांच्या नात्यावर किंवा लग्नाच्या वृत्तावर कोणताही अधिकृत शिक्कामोर्तब केलेला नाही. नेटकऱ्यांच्या मते, हे एखाद्या आगामी मोठ्या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मृणाल की धनुष... शिक्षणात कोण कोणावर भारी? एकाला तर डिग्री मिळण्याआधीच कॉलेजने काढलं होतं बाहेर!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल