नॅट स्कीव्हर ब्रंट वगळता मुंबईची ओपनर हिली मॅथ्यूजने 39 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीने 56 रन केले. आरसीबीकडून लॉरेन बेलने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर नदिने डे क्लार्क आणि श्रेयांका पाटील यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मुंबई इंडियन्ससाठी डब्ल्यूपीएलचा हा सामना करो या मरो चा आहे. कारण मुंबईने 6 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून 4 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटून दुसऱ्या म्हणजेच 4 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर यूपी वॉरियर्सही 6 सामन्यात 2 विजयांसह शेवटच्या क्रमांकावर आहेत.
advertisement
6 सामन्यांमध्ये 5 विजय आणि एका पराभवासह आरसीबीची टीम आधीच प्ले-ऑफसाठी क्वालिफाय झाली आहे. तर दिल्ली, गुजरात, मुंबई आणि यूपी यांच्यात क्वालिफिकेशनची रेस सुरू आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबईचा स्पर्धेत केवळ एकच सामना शिल्लक आहे, त्यामुळे गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवावा लागणार आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली 6 सामन्यात 3 विजय आणि 3 पराभवांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गुजरातचेही दिल्लीप्रमाणेच 3 विजय आणि 3 पराभव झाले आहेत. पण नेट रनरेटमुळे गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
